कुरखेडा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती भाजपा कार्यालयात उत्साहात साजरी

70

The गडविश्व
ता.प्र/कुरखेडा, दि. १४ : भारतरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती भाजपा कार्यालय कुरखेडा येथे अत्यंत उत्साहात व गौरवपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
कार्यक्रमाला भाजपा ओबीसी जिल्हा महामंत्री रवींद्र गोटेफोडे, शहर अध्यक्ष सागर निरंकारी, प्रा. विनोद नागपूरकर, राजेश उईके, अंग्रेज कराडे, पुष्पराज रांहागडाले, हेमराज नंदेश्वर, लालकृष्ण नंदनवार, जयश्रीताई मडावी, रूपालीताई कावळे, माजी नगरसेविका अर्चना वालदे, शितलताई लांजेवार, कल्पना मांडवे, अहिल्याताई लोथे, शोभा लाकडे, आशिष कोवे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बाबासाहेबांच्या सामाजिक न्याय, बंधुता व समतेच्या विचारांचे स्मरण करून उपस्थितांनी त्यांच्या कार्यप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाला भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून जयंती साजरी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here