The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, २६ ऑगस्ट : आम आदमी पार्टी तालुका कुरखेडाच्या वतीने जांभुलखेडा येथे शाखेचे विस्तार व पक्षप्रवेश २५ ऑगस्ट रोजी घेण्यात आला. यावेळी गावातील बहुसंख्य नागरिकांनी अरविंदजी केरजरीवाल यांच्या विकासकामामूळे प्रभावित होऊन आम आदमी पक्षात प्रवेश घेत पक्षाला निस्वार्थपने वाढविण्याचा निर्धार घेत केजरीवाल यांच्या कामाची प्रशंशा केली.
आम आदमी पार्टीने गडचिरोली जिल्ह्यात आगामी निवडणुका पुढे ठेवत पक्षप्रवेश व संपर्क वाढविणे सुरू केले आहे. या कार्यक्रमाला जिल्हा संयोजक बालकृष्ण सावसाकडे, कोटकर जिल्हा OBC सेल अध्यक्ष, साखरे सेवा निवृत्ति सेल, वरिष्ठ मार्गदर्शक नसिरभाई हाशमी, तालुका अध्यक्ष ईश्वर ठाकुर, तालुका उपाध्यक्ष चेतन गहाने, ता.स. ताहिर शेख, अ.नू. ज. अध्यक्ष राजू मडावी, अतुल सिंद्राम्, दीपक धार्गाये, शहजाद हाशमी, जनबंधु, ताज भाई कुरेशी तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.