कुरखेडा : लाच मागितल्या प्रकरणी वनपाल एसीबीच्या जाळ्यात
– २० हजारांची लाच स्वीकारताना अटक
The गडविश्व
कुरखेडा, दि. २४: तक्रारदार हा आपल्या ट्रॅक्टरने घरकुलासाठी लागणाऱ्या रेतीची वाहतूक करीत असताना त्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी २५ हजारांच्या लाच रकमेची मागणी करून तडजोडीअंती २० हजारांची लाच स्वीकारताना वन परीक्षेत्र अधिकारी कार्यालय पुराडा, उपक्षेत्र कोहका येथील वनपाल नरेंद्र सिताराम तोकलवार यास लाच स्वीकारताना लाचलुपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २४ जानेवारी २०२५ रोजी रंगेहाथ पकडले. सदर कारवाईने वनविभागात खळबळ उडाली आहे.
यातील तक्रारदाराकडे ट्रॅक्टर असून घरकुलासाठी लागणारी रेती ट्रॅक्टरने वाहतूक करीत असताना वनपाल नरेंद्र तोकलवार याने त्यास थांबवून ट्रॅक्टर वर कोणतीही कारवाई न करण्यासाठी २५ हजार रुपयांच्या लाच रकमेची मागणी केली. तक्रारदार यास सदर लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने लाचलुपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली येथे २३ जानेवारी रोजी तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी दरम्यान नरेंद्र सिताराम तोकलवार याने तक्रारदारास ट्रॅक्टर वर कोणतीही कारवाई न करण्यासाठी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती २० हजारांची लाच स्वीकारताना शुक्रवार २४ जानेवारी रोजी ला.प्र.वी गडचिरोली पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी लाचखोर वनपाल नरेंद्र तोकलवार यास पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. सदर कारवाईने वनविभागात खळबळ उडाली आहे.
सदर कारवाई दिगंबर प्रधान पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर, सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नागपूर परिक्षेत्र, संजय पुरंदरे,अपर पोलीस अधीक्षक ला. प्र. वि. नागपूर परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनात व चंद्रशेखर ढोले, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. गडचिरोली यांच्या परिवेक्षणात शिवाजी राठोड, पोलिस निरिक्षक, पोलिस निरिक्षक संतोष पाटिल, स.फौ.सूनिल पेद्दिवार, पो. हवा. शंकर डांगे, संदीप घोरमोडे, संदीप उडान, राजेश पद्मगिरवांर , प्रविण जुमनाके हितेश जेट्टिवार, म.पो.शी. जोत्स्ना वसाके, विद्या मशाखेत्री, चालक . पो हवा राजेश्वर कुमरे यांनी केली.