कुरखेडा : चारचाकी वाहनाची झाडाला जबर धडक, चालक ठार

632

The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, २३ फेब्रुवारी : चारचाकी वाहनाची झाडाला जबर धडक बसून अपघात झाल्याची घटना कुरखेडा तालुक्यातील रानवाही नजीक घडली. या अपघात चालक ठार झाला आहे. गीतेश्वर ऊर्फ गोलू तिलक महाजन (२२) रा.पुराडा असे मृतक चालकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक हा एमएच २९ एआर ०५२६ क्रमकाच्या चारचाकी वाहनाने पुराडा येथून रामगडमार्गे मालेवाडाकडे जात होता. दरम्यान रानवाही नजीक वाहन अनियंत्रित झाल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर धडकली. धडक इतकी जबर होती की चारचाकी वाहनाचा चकनाचूर झाला. सदर अपघात मंगळवारी रात्रोच्या सुमारास झाला मात्र या मार्गाने वर्दळ नसल्याने सदर अपघात बुधवारी सकाळच्या सुमारास नागरिकांना निदर्शनास आला. घटनेची माहिती मालेवाडा पोलिसांना देण्यात आली. माहिती लमिळताच मालेवाडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठविला. पुढील तपास मालेवाडा पोलिस करीत आहेत.
सदर घटनेने मृतकाच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून मृतकाचे काही दिवसांपूर्वी साक्षगंध झाले होते असे कळते.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The Gdv) (Car Accident)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here