कुरखेडा : निधी अभावी रखडले ‘मोदी आवास’ योजनेतील घरकुलाचे काम

826

– निधी नसल्याने थांबली लाभार्थ्यांची कामे
The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : राज्यातील ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना राबविण्यास शासनाने जुलै २०२३ रोजी मान्यता दिली. मात्र गडचिरोली जिल्हयातील अनेक तालुक्यातील ‘मोदी आवास घरकुल’ योजनेतील घरकुलाचे काम निधी अभावी रखडल्याचे कळते. जिल्हयातील कुरखेडा तालुक्यातीलही हीच परिस्थीती आहे.
सर्वांसाठी घरे २०२४ हे राज्यशासनाचे धोरण असुन त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना २०२४ पर्यंत स्वत: चे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न आहे. त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहेत. आवास प्लस मध्ये अंतर्भुत होऊ न शकलेल्या अनुसुचित जाती व जमाती प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी राज्य शासनाच्या रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदीम आवास योजना तसेच विमुक्त जामी भटक्या जमातीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व धनगर आवास योजना इ. उपलब्ध आहेत. तर इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांकरीता अशा प्रकरच्या कोणत्याही योजना अस्तित्वात नाही. इतर मागास प्रवर्गातील घरकुलास पात्र लाभार्थी घरकुराच्या लाभापासून वंचित राहत आहेत. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत तयार करण्यात आलेल्या आवास प्लस यादी मध्ये राज्यातील मोठया प्रमाणावर पात्र लाभार्थ्यांची नावे विविध कारणांमुळे अंतर्भुत होऊ शकली नाहीत ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने या संदर्भात केंद्र शासनाकडे या पात्र लाभार्थ्यांचा समावेश आवास प्लस प्रणालीवर करण्याकरीता मान्यता देणे बाबात प्रस्तावित केले होते. केंद्र शासनामार्फत सदर प्रस्तावाला मान्यता प्राप्त झाली नाही याप्रकरणी अशा लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्याकरीता राज्य शासनाने स्वतःची योजना तयार करावी असे निर्देश दिल्याने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी देखील मंत्रीमंडळ बैठकीमध्ये अशा प्रकारची नवीन योजना लागू करण्याबाबत सुचीत केले. २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतांना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांनी इतर मागास वर्गासाठी ३ वर्षात १० लाख घरे पुर्ण करण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्याची घोषणा केली.
शासनाचे ३ वर्षात १० लाख घरांचे उद्दिष्ट असले तरी कुरखेडा तालुक्यात परिस्थीती वेगळी पहावयास मिळत आहे. घरकुल योजनेचा उर्वरित निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने घरकुलाचे काम रखडले आहे. काही लाभार्थ्यांना योजनेचा पहिला हप्ता मिळाला आहे तर काहींना अदयापही एकही निधी मिळाला नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ऐन पावसाळयात घरकुलाचे काम सुरु असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना राहण्यासाठी इतरत्र जागा शोधावी लागत आहे. राज्य शासनाने लवकरात लवकर निधी उपल्ब्ध करून दयावा अशी मागणीही लाभार्थ्यांनी केली आहे.

मोदी अवास योजनेतील अर्थसहाय्य वितरण पध्दती

सदर योजनेची अंमलबजावणी, संनियंत्रण व समन्वय ग्रामविकास विभागामार्फत असलेले राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालय करते. जिल्हा पातळीवर प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यामार्फत तर योजनेकरिता आवश्यक निधी राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालय यांचेकडे शासनामार्फत वर्ग करण्यात येते.
घरकुल योजनेअंतर्गत राज्य शासनाने घोषीत केलेल्या डोंगराळ दुर्गम भाग क्षेत्रामध्ये घरकुल बांधकामाकरीता प्रति घरकुल १.३० लाख व सर्वसाधारण क्षेत्राकरीता १.२० लाख अर्थसहाय्य देय आहे.

मोदी आवास घरकुर योजना २०२३-२४ अंतर्गत कुरखेडा तालुक्यात ७६५ लाभार्थी आहेत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत २१८ घरे भौतीक दृष्टया पूर्ण झालेली आहे तर ५४७ घरे अदयापही अपुर्ण आहेत. राज्य शासनामार्फत मिळणारा निधी उपलब्ध नसल्याने लाभार्थ्याच्या खात्यावर घरकुलाची उर्वरित रक्कम अदा झालेली नाही. याबाबत पुढे प्रस्ताव पाठविला असुन निधी उपलब्ध झाल्यास लाभार्थ्यांच्या खात्यावर निधी वळता केला जाणार आहे.
– श्री. पाटील (गटविकास अधिकारी पं.स. कुरखेडा )

(thegdv, thegadvishva, gadchirolinews, modi avas yojna, kurkheda, gadchiroli local news, Brazil vs Costa Rica, Croatia vs Italy,Albania vs Spain, Axar Patel,Gautam Adani, AFG बनाम BAN, OnePlus Nord CE 4 Lite, भारत बनाम ऑस्ट्रेलिया, Messi, PM Modi, SSC CGL )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here