– आदर्श उपक्रमाची सर्वत्र चर्चा
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. १४ : स्थानिक मुस्लिम समाज मंडळाचा वतीने आज १४ एप्रील सोमवार रोजी सकाळी १०.३० वाजता विश्वरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त प्रशंसनीय व आदर्श उपक्रम राबवित येथील डॉ. आंबेडकर चौकात असलेल्या बौद्ध विहारात भगवान गौतम बूद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे दर्शन घेऊन त्यासमोर दीप घेऊन त्यासमोर दीपप्रज्वलन व माल्यार्पण करण्यात आले.
शहरातील सर्वधर्मीय नागरिकांमध्ये सौहार्दाची परंपरा जपत मुस्लिम समाजाच्या वतीने बौद्ध विहाराला अभिवादन भेट देण्यात आली. यावेळी बौद्ध बांधवांना मुस्लिम समाजाच्या वतीने सन्मानाने निळा धार्मिक ध्वज प्रदान करण्यात आला तसेच मिठाईचे वाटप करून जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी मसूद शेख, माजी अध्यक्ष अयुब खान, वलीअहेमद खान, साजिद शेख, आसिफ शेख, रियाज़ शेख, शहेबाज शेख, यूसुफ पठान, सादिक शेख, सिराज पठान, जावेद शेख यांच्यासह अनेक मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वधर्मीय ऐक्याचा आणि सामाजिक सौहार्दाचा एक उत्तम आदर्श ठरलेला हा उपक्रम समाजाला प्रेरणादायी ठरला.
