– शेतकऱ्यांची मागणी
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा (चेतन गहाने), दि.०२ : तालुक्यातील कढोली परिसरात अवकाळी पावसाने झोपून काढल्याने धान पिकासह इतर पिकाची नुकसान झाले असुन संबंधित यंत्रणेने पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवुन मदत करावी अशी मागणी तालुक्यातील काढोली परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
कढोली परिसरात २८ नोव्हेंबर रोजी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतात कापून ठेवलेल्या व रचून ठेवलेल्या धानाचे नुकसान झाले. या परिसरात शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय धान उत्पादन आहे. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांचे वर्षभराचे नियोजन होते. धान कापणी सुरू असून बहुतांश शेतकऱ्यांची धान कापून ठेवलेलस आहेत व बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात पीक उभे आहे. अशा परिस्थितीत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतातील धान्याचे कडप तसेच उभे दान पाण्याखाली आल्याने मोठे नुकसान झाले आहे. शासन व विमा कंपनीकडून आर्थिक मदत मिळावी याकरिता तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवावे अशी मागणी कढोली परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या धान कळपांचा त्वरित पंचनामा करून शासन व विमा कंपनीने याकडे लक्ष वेधून त्वरित शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा अशी मागणी कढोली परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
