The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, ३० डिसेंबर : स्थानिक उपजिल्हा रुग्णालयाला राज्यस्तरीय ‘कायाकल्प’ प्रोत्साहनपर पुरस्कार जाहिर झाला आहे.
सर्व आरोग्य संस्थामध्ये कायाकल्प योजना राबविण्यात येत असुन शासनाच्या माध्यमातुन चालविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेतील गुणवत्ता आणि सोयी सुविधा, उत्कृष्ट सेवा, बायोमेडीकल वेस्ट मॅनेजमेंट आणि स्वच्छता या सर्व बाबीचा विचार करून आरोग्य संस्थांना कायाकल्प योजनेअंतर्गत पारितोषिकाकरीता पात्र ठरविण्यात आलेले आहेत. यामध्ये उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा यांना १ लक्ष रुपये प्रोत्साहनपर पारितोषिक जाहीर झालेले आहे.
सदर प्राप्त पारितोषिकाच्या माध्यमातुन रुग्णालयातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचाविण्याकरीता तसेच रुग्णांना उत्कृष्ट सेवा बहाल करण्याकरीता मदत होईल असे कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक (वर्ग- १) डॉ. अमित ठमके यांनी कळविले आहे.
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (MLA Krushna Gajbe) (Kurkheda) (hospital) (kayakalp)