कुरखेडा : अवैधरित्या गोवंश तस्करी, पाच  ट्रकसह ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त

625

– आरोपी फरार, गोववंशाची सुटका
The गडविश्व
ता. प्र / चेतन गहाने ( कुरखेडा), दि.०८ : कोरची तालुक्यामधून ट्रकमध्ये अवैधरित्या गोवंशाना अमानुषपणे एकावर एक लादत तेलंगनाकडे वाहतूक करतांना सापळा रचत कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी व  पथकाने कुरखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पाच ट्रकसह ५७ लाख ३९ हजाराचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई बुधवार ६ मार्च रोजी केली.दरम्यान ट्रकमध्ये अवैधरित्या वाहतूक करीत असलेल्या १४३ नग गौवंशांची सुटका केली. मात्र यातील आरोपी हे घटनास्थळी ट्रक सोडून फरार झाले आहेत,
मिळालेल्या माहितीनुसार, कुरखेडा-कोरची मार्गावरून अवैधपणे गोवंशाची तस्करी करण्यात येत असल्याच्या माहितीवरून बुधवारी रात्रो गोठणगांव नाक्यावर पोलीसानी सापळा रचला होता. मात्र तस्कराना याची पूर्वीच कुणकुण लागल्याने ते आड मार्गाने तेलंगानाकडे पळून‌ जाण्याचा प्रयत्नात असताना पोलीसानी त्यांचा पाठलाग करीत मोठ्या शिताफीने त्याना अटकाव केला यावेळी तस्करानी सर्व ट्रकचे वायर तोडत ट्रक तिथेच ठेवत पळ‌ काढला. पोलिसांनी सर्व जप्त ट्रक पोलीस ठाण्यात जमा करत ट्रकमध्ये अमानुषपणे पाय बांधून एकावर एक ठेवलेले १४३ गोवंशाची सुटका करण्यातआली . यातील ४ गोवंश दगावली होती. लगेच जनावराना गोशाळेत पाठविण्याकरीता भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील गोशाळा व्यवस्थापकांशी संपर्क करीत त्यांचाच वाहनाने जिवंत असलेले सर्व जनावराना तिथे पाठविण्यात आले मात्र यावेळी पाठविण्यात आलेले अनेक जनावरे ही सूद्धा मरनासन्न अवस्थेत असल्याने गोशाळेत पोहचे पर्यंत सूद्धा अनेक जनावरे दगावली अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रविन्द्र भोसले यानी दिली आहे.
दरम्यान अवैधरित्या गोवंशाची अमानुषपणे वाहतूक करीत त्यांचा मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या गोतस्करांविरुद्ध कुरखेडा पोलीस स्टेशन येथे कलम २७९,४२९ भा द वि ५,५(अ),५(ब), ९,११ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सहकलम ११(१),ड,ई,फ प्राण्याचा छळ अधिनियम सहकलम ११९ महाराष्ट्र पोलीस अधिनियम सहकलम १८४ अन्वये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात एकूण ५ ट्रक सह ५७ लाख ३९ हजाराचा मूद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सूरू असून लवकरच त्याना अटक करण्यात येईल अशी माहिती सूद्धा यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी कूरखेडा रविन्द्र भोसले यानी दिली आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #kurkheda #gadchirolipolice #kurkhedapolice #govansh )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here