The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १२ : तालुक्यातील मालेवाडा परिसरात अवैध रित्या होत असलेला ट्रॅक्टर महसूल विभागाने जप्त केल्याची कारवाई रात्रोच्या सुमारास करण्यात आली. तीर्थराज चांभोरे रा. उपदल्ली असे जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टर मालकाचे नाव आहे. सदर कारवाईने अवैध रित्या रेती तस्करी करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा परिसरात मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत असल्याची माहिती तहसीलदार यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे तहसीलदार यांच्या मार्गदर्शनात मंडळ अधिकारी नवले व त्यांच्या पथकाने काल रात्रो ९.४० वाजताच्या सुमारास अवैद्य गौण खनिज उत्खनन व वाहतूक पथक गस्तीवर असताना मालेवाडा परिसरात अवैधरित्या रेतीची ट्रॅक्टरद्वारे तस्करी करतांना कारवाई करत पोलीस स्टेशन मालेवाडा येथे सुपूर्द करण्यात आले.
सदर कार्यवाही मंडळ अधिकारी नवले, मंडळ अधिकारी खरकटे, तलाठी ठाकरे, ब्राह्मणवाडे यांनी केली.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolinews #gadchirolipolice #kurkheda #accidentpolicy #postoffice #muktipath )