कुरखेडा : सती नदीवरील खचलेल्या रपट्याचे तातडीने बांधकाम करा

650

– भाजयुमो तालुका अध्यक्ष उल्हास देशमुख यांची मागणी
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा (चेतन गहाने) दि. २२ : मागील दोन महिण्यापूर्वी येथील सती नदीवरील रपटा खचल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली. त्यामुळे नागरीकाना १५ ते २० किमी अधिकचा फेरा घालावा लागत आहे. विद्यार्थी, रुग्ण, तसेच नागरिकांना मोठा शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पावसाचा वेग मंदावत नदीच्या पाण्याचा प्रवाह कमी झालेला आहे त्यामूळे संबंधित यंत्रणेने खचलेल्या रपट्याची तातडीने पूनर्रबांधणी करीत नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे कुरखेडा तालुका अध्यक्ष उल्हास देशमुख यानी केली आहे.
कुरखेडा तालुका मुख्यालयाला ग्रामीण भागाशी जोडणारा शहराच्या सती नदी वरील पूलाला तोडत नविन पूलाचे बांधकाम सूरू आहे. येथे वाहतूकीस खोळंबा निर्माण होऊ नये म्हणून पूलाच्या बाजूनेच रपटा तयार करण्यात आला होता. मात्र हा रपटा पहिल्याच पावसात वाहून गेला. यावेळी रपटा दुरूस्ती करीता संबंधित यंत्रणेकडून प्रयत्न करण्यात आले होते मात्र त्यावेळी पावसाचा जोर अधिक असल्याने व नदीत पाण्याचा प्रवाहा जोरात असल्याने रपटा दूरूस्ती शक्य झाली नाही. मात्र सध्या पावसाने उसंत घेतल्याने नदीमधील पाण्याचा प्रवाह मंदावलेला असल्याने बांधकाम यंत्रणेने तातडीने या खचलेल्या रपट्याची पूनर्रबांधणी करावी व नागरीकाना दिलासा द्यावा अशी मागणी गुरुवारी उल्हास देशमुख यांनी रपट्याची पाहणी करताना केली. यावेळी बांधकाम प्रोजेक्ट मेनेजर जावेद शेख यांचाशी चर्चा सूद्धा केली व ब्रम्हपूरी येथील भूती नाल्यावरील खचलेल्या रपट्याची याच बांधकाम कंपनीने पाण्याचा प्रवाह कमी होताच दूरूस्ती केली त्यामूळे तातडीने येथील खचलेला रपट्याचे बांधकाम सुरू करण्याची मागणी केली आहे. लवकरच येथील बांधकाम सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले येवेली त्यांनी दिले.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews #kurkheda )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here