भाजपा शिष्टमंडळाची मागणी
The गडविश्व
ता. प्र /कुरखेडा, दि. २६ : तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना, शबरी योजना, रमाई योजना, मोदी आवास योजना व इतर योजनांअंतर्गत मंजूर घरकुलांसाठी आवश्यक रेती तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने तहसीलदार रमेश कुंभरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
घरकुल बांधकामांसाठी आवश्यक रेतीच्या टंचाईमुळे अनेक लाभार्थ्यांचे कामे ठप्प झाली आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता, रेतीचा तातडीने पुरवठा करण्यात यावा आणि इतर नागरिकांच्या घरकामांसाठी तसेच शासनाच्या विकास कामांसाठी रेती डेपो मंजूर करावा, अशीही मागणी करण्यात आली.
भाजप शिष्टमंडळाने तहसीलदार कुंभरे व उपविभागीय अधिकारी रणजीत यादव यांची भेट घेत लाभार्थ्यांची व्यथा मांडली. यावर तहसीलदार कुंभरे यांनी दोन दिवसांत रेती उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
या शिष्टमंडळात भाजप तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, ओबीसी जिल्हा महामंत्री रवींद्र गोटेफोडे, शहराध्यक्ष सागर निरंकारी, प्रा. विनोद नागपूरकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष उल्हास देशमुख, शहर महामंत्री राहुल गिरडकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मोनेश मेश्राम, आणि मंगेश मांडवे आदींचा समावेश होता.

#कुरखेडा #घरकुलयोजना #भाजपा #रेतीपुरवठा #प्रधानमंत्रीआवासयोजना #शासनयोजना #विकासकामे #तालुकान्यूज
#Kurkheda #HousingScheme #BJP #SandSupply #PMAY #GovernmentScheme #DevelopmentWorks #TalukaNews #thegdv #thegadvishva #kurkheda #gadchirolilocalnews