कुरखेडा : चारभट्टी परिसरात रानटी हत्तीचा धुमाकूळ, धान पिकांची केली नासाडी

831

– शेतकऱ्याचे नुकसान
The गडविश्व
ता.प्र / कूरखेडा, २३ जुलै : तालुक्यात पुन्हा हत्तींच्या कळपाने प्रवेश करत धुमाकूळ माजवला आहे. तालूका मूख्यालयापासून १४ कि.मी अंतरावर असलेल्या चारभट्टी परिसरात काल रात्रो ते आज पहाटेच्या दरम्यान रानटी हत्तीच्या कळपाने धूमाकूळ माजवत या परिसरातील अनेक हेक्टर धान शेती पायदळी तूडवत उध्वस्त केल्याचे कळते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नूकसान झाले असून या नुकसानीची येथील पदाधिकाऱ्यांनी आज रविवारी पाहणी केली व वनविभागाने तातडीने नूकसानीचे पंचनामे करीत नूकसान भरपाई अदा करावी अशी मागणी केली आहे.
गोंदिया जिल्हातील राजोली, भरनोली परीसरातील जगंलातून काल रात्रो १४ च्या संख्येत असलेल्या रानटी हत्तीचा कळपाने चारभट्टी परिसरात प्रवेश केला. दरम्यान येथील धान पिकाला पायदळी तुडवत नासाडी सूरू केली. हत्तीचा या उपद्रवाची कुणकुण गावकऱ्यांना लागताच गावकऱ्यांनी समूहाने घटनास्थळाकडे धाव घेत टार्च व विस्तव पेटवत हत्तीचा कळपाला पीटाळून लावण्याचा प्रयत्न केला मात्र पहाटे पर्यंत त्यांचा उपद्रव सूरूच होता. यानंतर ते जगंलाच्या दिशेने निघून गेले. यावेळी‌ चारभट्टी येथील शेतकरी सूर्यभान हर्षे, भागवत निंबेकर, फकीरा सोनबोईर, सोनाली मारगाये, जनकलाल भैसारे, पुसाऊ आडील, मनोहर आडील, भाऊराव तिरगम, केवळराम नाट, करंगसू कवडो, सूरेश कवडो, पतीराम कवडो, आनंदराव तिरगम, जांभूळकर या शेतकऱ्यांचा धान पीक हत्तीचा कळपाने पायदळी तूडवत मोठे नूकसान केले आहे. आज रविवार ला या परीसरातील नूकसान ग्रस्त शेतीची माजी जि.प.सदस्य प्रभाकर तुलावी, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष परसराम नाट, वासूदेव निंबेकर, भास्कर किंचक यांनी पाहणी केली व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नूकसान भरपाई अदा करण्याची मागणी केली. यावेळी वनविभागाचे क्षेत्रसाहायक शेंडे, वनरक्षक काशीवार, वनमजूर विठ्ठल मांडवे, मधूकर दरवडे यांनी नूकसानीचे सर्वेक्षण करीत अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवत असल्याचे सांगीतले.

(the gdv, the gadvishva, gadchiroli news, forest elephant in gadchiroli kurkheda, Kurkheda: In Charbhatti area wild elephants have destroyed paddy crops)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here