– तालुक्यात खळबळ
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, १७ ऑगस्ट : तालुक्यातील सती नदी पात्रात मासेमारी करीता गेलेल्या व्यक्तीला नवजात अर्भक आढळल्याची घटना गुरुवार १७ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. सदर घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील कुंभिटोला परिसरातील सती नदी पात्राता आज सकाळच्या सुमारास काही मासेमार मासेमारी करिता गेले. दरम्यान नदी पात्रात नवजात अर्भक आढळून आले. लागलीच माहिती फोनद्वारे प्रतिनिधीला कळविण्यात आली असता याबाबत पोलिसांना कळविले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून अर्भक ताब्यात घेतले.
सदर घटनेवरून कोणीतरी आपल पाप लपविण्यासाठी हे कृत्य केल्याचे बोलल्या जात आहे.
(the gadvishva, gadchiroli news, kurkheda)