– बैलगाडीतून काढली मिरवणूक
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. ०३ : राज्यात नवीन शैक्षणिक सत्राला १ जुलै पासून सुरुवात झाली. दरम्यान कुरखेडा तालुक्यातील चिचटोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवागतांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
इयत्ता पहिली मधील विद्यार्थ्यांना शिक्षकांनी बैलगाडीमध्ये बसवून गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पहावयास मिळाला. यावेळी गावातील नागरिकांनाही विद्यार्थ्यांच्या या प्रवेश उत्सवात सहभाग घेतला.
यावेळी मुख्याध्यापीका सहारे, शिक्षक लीलाधर वाढई, अतुल सिंद्राम, ग्यानदास मडावी, प्रकाश सिंद्राम, रामलाल मडावी, कबलास नैताम, सुमन मडावी, महासीर सिंद्राम, फुलवता नैताम, दमाहे मॅडम, शोभा सिंद्राम पालक वर्ग उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #kurkheda)