The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. २७ : संत निरंकारी चैरिटेबल ट्रस्ट शाखा कुरखेडा व मालेवाडा च्या वतीने रविवार २५ फेब्रुवारी रोजी केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाचा प्रोजेक्ट अमृत अंतर्गत येथील हनूमान मंदिर तलावात सकाळी ८ ते १२ वाजता दरम्यान श्रमदान करीत स्वच्छता अभियान राबविण्यात आली.
संत निरंकारी मंडळा द्वारे सदगूरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनात देशातील २७ राज्यात ११०० ठिकानी हे अभियान एकाच वेळी राबविण्यात आले. याचाच एक भाग म्हणून शहरातील हनुमान मंदिर तलावात स्वच्छता अभियान राबवित येथील साठवलेल्या पाण्याला दुषित करणारा प्लास्टिक व अन्य कचऱ्याची स्वच्छता करण्यात आली व येथील जलसाठा प्रदूषित होणार नाही याकरीता प्रचार पत्रकाद्वारे संदेश देण्यात आला.
अभियानाचा शुभारंभ संत निरंकारी मंडळाचे कुरखेडा शाखा प्रमूख माधवदास निरंकारी यांच्या मार्गदर्शनात तलावाच्या पाळीवर सदगुरू प्रार्थना करीत करण्यात आली.
मोहीमेत मधूकर निनावे, सेवादल संचालक दिलीप निरंकारी, सेवादल शिक्षक अजय पूस्तोडे तसेच सेवादलाचे सर्व सदस्य व निरंकारी स्वंयसेवक सहभागी झाले होते.