कुरखेडा : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने दुर्गामाता मंदिर परिसरात नागपूर कराराची होळी

77

कुरखेडा : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने दुर्गामाता मंदिर परिसरात नागपूर कराराची होळी
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. २८ : तालुक्यातील काढोली येथील दुर्गा माता मंदिर परिसरात वेगळ्या विदर्भ झालाच पाहिजे या मागणीला वेधून कढोली येथील माजी सरपंच चंद्रकांत बुके व सेवाकर सहारे अविका संचालक यांच्या नेतृत्वात नागपूर कराराची होळी करण्यात आली.
दरम्यान पोलीस विभागाच्या वतीने निवेदन स्वीकारून पुढील कारवाईस मान्यता देण्यात आली. निवेदन स्वीकारताना कुरखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भोंबे, कालिदासजी मडावी पोलिस हवालदार किरंगे, शेखर मडावी, तलाठी ठाकरे, मंडळ अधिकारी किरंगे मॅडम व काढोली येथील सामाजिक कार्यकर्ते ईश्वर चौधरी, धनंजय पाटील इंदगे, पिंटू आकरे, कालिदास पाटील नारनवरे, मारुती वाडई, तुळशीराम सोनबावणे ,फुकट पाटील गरमाडे, यशवानंद इंदुरकर, प्रमोद जराते, बाल्या मानागुडदे कृष्णा नेवारे, बघूजी ताडाम, राहुल ठेंगरी, दीपक जनबंधू, मयूर जांबुडे, व कडोली येथील विद्यार्थी, विद्यार्थिनी व काढोली वासिया जनता बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here