– यात्रा वाहनावर ‘मोदी सरकार’ उल्लेख असल्याने नागरिक संतप्त
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २३ : भारत सरकारच्या विविध योजनांची माहिती आणि लाभ देण्याच्या उद्देशाने राज्यभरात विकसित भारत संकल्प यात्रा सुरू आहे. गडचिरोली जिल्हा प्रशासनानाच्या वतीने जिल्ह्यात यात्रा वाहनाच्या माध्यमातून गावागावात योजनेविषयी माहिती सांगण्यात येत आहे मात्र कुरखेडा तालुक्यातील गावांमध्ये सदर विकसित भारत संकल्प यात्रा पोहचल्यानंतर ग्रामस्थांनी त्यास विरोध दर्शवत परत पाठविले. एवढेच नाही तर त्या वाहनावर ‘मोदी सरकार’ असा उल्लेख केला असल्याने नागरिक संतप्त होत ‘भारत सरकार’ असा उल्लेख वाहनावर का केला नाही असा सवाल करत आहे. याबाबतचे चित्रफीतही समाजमाध्यमांवर वायरल झाले आहेत. https://www.instagram.com/p/C3sre_wMr0x/?igsh=c3U1dW82aXkyNjNr
जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील तळेगाव, सोनसरी तसेच येंगलखेडा येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे वाहन पोहचले आणि ग्रामस्थांनी त्यास विरोध दर्शवत परत पाठविले. २२ फेब्रुवारी रोजी सोनसरी येथील ग्रामस्थांनी तर २३ फेब्रुवारी ला येंगलखेडा येथील ग्रामस्थांनी विरोध दर्शविला तर यापूर्वी तळेगाव व चामोर्शी तालुक्यातील एका गावात एका तरुणाने विरोध दर्शविला होता. तळेगाव ग्रामपंचायतीने ठराव घेत ‘ही यात्रा आमच्या गावात नको,’ असे स्पष्ट केले. सोनसरी, येंगलखेडा येथीलही ग्रामस्थानी विरोध दर्शवित यात्रा परत पाठविली. त्यामुळे ही यात्रा पुन्हा एकदा वादात सापडली आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #12exam #hscexam #sankalpviksasyatra
#संकल्प_विकास_यात्रा )