– मुद्देमाल जप्त, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, १८ जानेवारी : स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या गोपनिय माहिती मिळाली असता त्या माहितीच्या आधारे कुरखेडा पोलिसांनी १६ जानेवारी रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील सोनसरी येथे चक्रीवर चालणार जुगार चालत असतांना पोलिसांनी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास धाड टाकून नगदी ६ हजार ४१० रुपये व चक्री जुगाराचे साहित्य जप्त करून आरोपी पितांबर सिताराम कोवे रा. देलनवाडी, आनंदराव गणपत कुंमरे रा.चवरीदंड विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसरी कारवाई सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास शहरातील एका किराणा दुकानात विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी व विदेशी दारूची विक्री करण्याचे उद्देशाने मुद्देमाल ताब्यात बाळगताना पोलीसांना मिळून आला. कारवाई दरम्यान १७ हजार ४५० रुपयाची देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली व आरोपी विरुद्ध दारुबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुरखेडा पोलीस करीत आहेत. कुरखेडा तालुक्यात पोलिसांमार्फत करण्यात येणाऱ्या धडक कारवाईने अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
(The Gadvishava) (Gadchiroli News) (Muktipath) (Tejasvi Surya) (Crystal Palace vs Man United) (Wolves vs Liverpool) (SBI PO Prelims Result) (JEE Main 2023 Admit Card) (Kurkheda)