कुरखेडा : पुनर्वसीत परिसर विकासापासून वंचित

179

– सोयी, सुविधा पुरविण्याची न.पं. मुख्याधिकारी यांना निवेदनातून मागणी
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, १७ ऑक्टोबर : येथील राणा प्रताप नदी काठच्या लोकांचे पुनर्वसन करण्यात आले मात्र पुर्नवसन होऊनही नागरिक अनेक सोयी सुविधांपासून वंचित आहे.
शहरातील राणा प्रताप वार्ड नदी काठच्या नागरिकांचे सर्वे न.१९४ पोलीस स्टेशनच्या बाजूला पुनर्वसन करण्यात आले. पण पुनवर्सन होऊनही अद्याप त्या परिसरात कोणतेही विकास कामे झाले नाहीत, रस्ते, नाली, पाण्याची व्यवस्था तसेच विद्युत या सेवांचा अभाव असल्याने नागरिकांना त्याठिकाणी राहणे कठीण झाले आहे, नगर पंचायती मार्फत पूरग्रस्त लोकांना घरकुल देण्यात आले, बरीचशी घरे बांधून झाले मात्र सोयी सुविधेच्या अभावाने मात्र नागरिक त्रस्त झाल्याने नगरिकांनी या भागात सोयी सुविधा पुरवून विकास करावा अशी मागणी निवेदनातून मुख्याधिकारी यांना केली आहे.
निवेदन देताना संदीप देशमुख, श्रीमती कुंदा नंदनवार, रखमा बाई मेश्राम, रामदास मस्के, गोवरअली शेख, संतोष अरगेलवार, इसराईल कुरेशी,भगवान बोरसरे, अरविंद मेश्राम, पंढरी बावनकार,श्रीमती वंदना कन्नाके, श्रीमती गीताबाई धारगाये, श्रीमती कौशल्या राऊत, पांडुरंग देशमुख, दादाजी येरावार, यादव वड्डे, महेश उपरीकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here