The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ०२ : एसआरपीएफ ग्रूप ९ अमरावती बेस कॅंम्प कुरखेडा यांचा वतीने शुक्रवार १ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता येथील उपजिल्हा रूग्णालयात भेट देत वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच रूग्णालयात दाखल रुग्ण यांना दिवाळीचा शुभेच्छा देत दिवाळीचा फराळ व मिठाई वितरन करीत आनंदोत्सव साजरा केला.
देशात सर्वत्र दिवाळीचा उत्सव आप्त स्वकीया सह सहकूटूंब साजरा करण्यात येत असताना सुरक्षा व्यवस्थेतील जवान तसेच वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आपल्या कर्तव्याचे पालन करताना प्रसंगी कूटूंबियापासून दूर राहावे लागते. सन उत्सवातही त्याना कूटूंबियासह सहभागी होता येत नाही. सदर बाब लक्षात घेत येथे पदस्थ एसआरपीएफ ग्रुपच्या वतीने वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच रुग्णांना दिवाळी निमित्त फराळ व मिठाई वितरीत करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी एसआरपीएफ ग्रूप ९ अमरावतीचे पोलीस निरीक्षक रशीद शेख, उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय मालविया, अधिपरीचारीका शालना बन्सोड, गणविर साहायक पोलीस उपनिरीक्षक, अशोक जाधव, पोलीस हवालदार रिज़वान खान, नईम शाहा, सचिन बहादूरे, अनिल अवचार, अमोल वानखेडे, महानंद भटकर, गजानन मूळे, अनिल धांडे, अब्दूल साबीर, अंकूश जाधव, शाम सांगळे, सागर ठाकूर, निलेश सरदार, प्रितम तावडे, अमोल शिवणकर, खुशाल यादव, हेमंत बारब्दे, विकास निमकर, राजकूमार अकर्ते, रमेश हंगरे, शुद्धोधन वाघपांजर, नितीन नवघरे आदि हजर होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolilocalnews #gadchiroliforest #muktipath #kurkheda #srpfpolice)