कुरखेडा : शिधापत्रिकेत नाव चढवणे व कमी करण्याच्या प्रक्रियेसाठी पुरवठा विभागात तुफान गर्दी

172

The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ०८ : येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागामध्ये शिधापत्रिकावर नाव कमी करने चढवने तसेच नाव ऑनलाइन करण्याच्या प्रक्रिये करीता तुफान गर्दी दररोज होतांना दिसते आहे. संथ गतिने होत असलेले काम आणि कागदाचा गठ्ठा हातात घेऊन नंबर लागेल या प्रतिक्षेतत नागरिक चांगलेच वैतागले आहेत.
शिधापत्रिकेत नाव कमी व समाविष्ट करण्यासाठी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडे शेकडो नागरिक धाव घेत आहेत. त्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा म्हणून ज्यांच्या कडे शिधापत्रिकेत नाव असून ऑनलाइन नाही असे अर्जदार तहसील पुरवठा कार्यालय मध्ये येऊन वेळेत आपले काम करण्यास पहात आहेत. मात्र कुरखेडा तहसील कार्यालयाशी सरळ जोडणारा गोठनगाव नाका सती नदी वरील रोडाचे संपर्क टुटल्याने नागरिकांना १० ते १५ किमी चा जास्त प्रवास करून तहसील कार्यालय गाठावे लागत असुन कार्यलयात येऊन फक्त अर्ज देण्यासाठी पूर्ण दिवस जात आहे सदर बाबीमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. एक तर
अधिकचा प्रवास मग अर्ज देऊनही दोन दोन महीने लोटूनही काम होत नसल्याने या विभागामार्फत गावो गावी शिधावितरक धारकांकडे ही अर्ज जमा करून होत असलेली गैरसोय थांबवून नागरिकांची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkheda )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here