The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि. ०७ : झाडीपट्टी रंगभूमीचे कलावंत ज्येष्ठ रंगकर्मी तथा मुख्याध्यापक लालचंद धाबेकर हे नूकतेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोंढाळा येथून सेवानिवृत्त झाले त्यांचा आज शनिवार रोजी आझादवार्ड कुरखेडा येथे वार्डवासीयांचा वतीने शाल श्रीफळ व पूष्पगूच्छ देत सत्कार करण्यात आला व पूढील वाटचालीचा शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी वार्ड निवासी वन परिक्षेत्र अधिकारी कैलाश धोडंणे, नगरसेवक ॲड. उमेश वालदे, शिक्षक राजेश उईके, रामकृष्ण मडावी, भास्कर तितीरमारे, कैलाश बंसोड, सिराज पठान,लिलाधर भरणे व वार्डवासी हजर होते.