– बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने चौकशीची मागणी
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २९ : शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्गाचे ५४३ चे काम सध्या प्रगती पथावर आहे. कुरखेडा ते गोठणगाव फाटा येथील महामार्गाच्या च्या दोन्ही बाजुने नाली बांधकाम होत आहे मात्र सदर नालीच्या बांधकामाचा दर्जा हा निकृष्ट असल्याचे मागील दिवसांत पहायला मिळाले असून या नाली बांधकामाची बांधणी किती मजबूत आहे हे आजच्या घटनेने दाखवून एकूणच नाली बांधकामाचे पितळच उघडे केले आहे.
कुरखेडा शहरातील मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजूला मोठी नाली बांधकाम सुरू आहे. सदर नाली वरून स्लॅब टाकण्यात आहे मात्र नविनच नाली वरील स्लैबवर मोठ – मोठे भगदाद पडल्याचे दिसत असून त्यांना लपविण्यासाठी सिमेंट लावून मलमपट्टी करण्याचा प्रकार सबंधित विभागाकडून करण्यात आला आहे तर पंचायत समिति समोर असलेली सदर नाली ओलांडताना ट्रकचे चाक त्यात फसल्याने नाली मोडकळीस आली तर आज शनिवार २९ जून रोजी नवीन बस स्टँड समोरिल नालिमध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या कामात कार्यरत असलेला टिप्पर मुरुम टाकत असतांना मागील दोन्ही चाक नाली खचल्याने फसल्याची घटना घडली. त्यामुळे सदर नाली बांधकामे पितळ उघडे पडले असून बांधकामाची गुणवत्ता लक्षात येत आहे. निकृष्ट होत असलेल्या नाली बांधकामाची अखेर कोण जबाबदारी घेणार ? असा प्रश्न आता स्थानिक नागरिक करीत आहेत. महिना पंधरा दिवसात खचत असलेली नाली किती दिवस चालणार ? असाही प्रश्न निर्माण होत असून याच नालीचा उपयोग शहरातून पायी चालणाऱ्या नागरिकांना फुठपाथ म्हणून होणार असल्याने कोणती नाही नाली केव्हा खचून कुणास जीव गमवावा लागेल अशी भीतीही निर्माण झाली आहे. या सर्व कामाची चौकशी करून तात्काळ संभंधित ठेकेदारावर कार्यवाही करण्याची मागणी जोर धरीत आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #kurkheda )