कुरखेडा : ग्रामपंचायतीचा रेकॉर्ड नेऊन जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्यास अडीच वर्षाची शिक्षा व दंड 

1052

– प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय शुक्ल यांचा न्यायनिर्वाळा
The गडविश्व
गडचिरोली, २६ जुलै : कुरखेडा तालुक्यातील चिचटोला ग्रामपंचायतमधील रेकॉर्ड नेऊन जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना १० जुलै २०१८ रोजी घडली होती. याप्रकरणी आता त्या आरोपीस गडचिरोली येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय बा.शुक्ल यांनी अडीच वर्षे सजा व १२ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
यातील आरोपी अरुण फागुव सिंद्राम (४०) रा. चिचटोला ता. कुरखेडा याने १० जुलै २०१८ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालय चिचटोला येथील ग्रामपंचायत शिपाई युनुस गौस मोहमद शेख याला शिवीगाळ करून रेकॉर्ड घेऊन गेला. याबाबत शिपाई ने सरपंचा कु. तुळशी उईके यांना फोनद्वारे कळविले असता त्यांना सुदधा शिवीगाळ करून ग्रामपंचायत रेकॉर्ड घेऊन नदीच्या पाण्यात फेकून देतो असे बोलून खून करण्याची धमकी दिली व रेकॉर्ड घेऊन गेला. त्यानंतर सरपंचा व ग्रामसेवक बरडे तसेच इतर ग्रा.पं. सदस्य यांना झालेल्या घटनेबाबत महिती दिली. दरम्यान सरपंचा ही ग्रामसेवक यांच्यासह चिचटोला येथे जात असतांना गावातील रोडवर आरोपी कुऱ्हाड घेऊन उभा होता. सरपंचा, ग्रामसेवक, निकिता मडावी हे कार्यलयात बसून असतांना आरोपी आपल्या हातात रॉकेल ची कॅन घेऊन आला व ऑफिस अंडी तुम्हाला जाळून टाकतो असे म्हणून सरपंचा व ग्रामसेवक याच्यावर रॉकेल टाकून माचीस घेतला तेव्हा उपसरपंच व शिपाई यांनी त्याला पकडले. याबाबत कुरखेडा पोलीस ठाण्यात सरपंचा यांनी तोंडी रिपोर्ट दाखल केली असता आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या घटनेची पोलीस यंत्रणेने कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. फिर्यादी व इतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून मंगळवार २५ जुलै २०२३ रोजी आरोपीस गडचिरोली येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय बा. शुक्ल यांनी कलम ३८० भादवी मध्ये १ वर्ष, ५ हजार रुपये दंड, कलम ३५४ भादवी मध्ये १ वर्ष, ५ हजार रुपये आणि कलम ५०६ भादवी अन्वये ६ महिने, २ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
सरकार पक्षातर्फे सहा. जिल्हा सरकारी वकील एस.यु.कुंभारे यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोउपनि विजय तुरपद, पोलीस स्टेशन कुरखेडा यांनी केले तसेच संबंधित प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधून प्रकरणाची निर्गती करिता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी खटल्याच्या कामकाजात योग्य भूमिका पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here