– २१ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, ८ ऑक्टोबर : कत्तलीसाठी ट्रक मध्ये कोंबून वाहतूक करीत असलेल्या २२ गोवंशांची सुटका करत २ ट्रकसह २१ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई ६ ऑक्टोबर ला उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कुरखेडा पोलीसांनी केली. सदर कारवाईने अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्यांची धाबे चांगलेच दणाणले आहे.
गडचिरोली जिल्ह्रातील गोवंशीय जनावरांच्या कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतुक करणाऱ्यांवर पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. ६ ऑक्टोबर ला आंधळी रोडणे मालवाहु वाहनामध्ये गोवंश जनावरांची वाहतुक होत आहे अशा गोपणीय बातमीदारांकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा/बाबुराव पुडो, राकेश पालकृतीवार, नरेश अत्यल्गडे व मनोज राऊत असे पोस्टे कुरखेडा हद्दीतील आंधळी गावासमोर थांबले असता थोड्या वेळात संशयित वाहन येत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना हात दाखवुन थांबविले आले मात्र दुरुनच पोलीसांना पाहुन वाहन चालक वाहन सोडुन पळून गेले. मालवाहु वाहनाजवळ जावुन बघीतले असता दोन मालवाहु वाहनांमध्ये गोवंश जनावरे अतीशय निर्दयतेने कोंबुन भरले असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर एम एच ४० सीडी १५४५ व एम एच ३४ एबी ९००१ या दोन्ही वाहनामध्ये
२२ गोवंश अंदाजे किंमत प्रत्येकी ७ हजार रुपये प्रमाणे एकुण किंमत १ लाख ५४ हजार रुपये व दोन मालवाहू ट्रक अंदाजे किंमत प्रत्येकी १० लाख रुपये २० लाख रूपये असा एकुण २१ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त करुन त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन, कुरखेडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षकनीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख सा. यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा साहिल झरकर सा. यांचे मार्गदर्शनात करण्यात आली.