कुरखेडा : नवरगाव सायटोला परिसरात रानटी हत्तींचा धुमाकूळ

1375

– शेतकऱ्यांचे नुकसान
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, १३ डिसेंबर : तालुका मुख्यालयापासून ५ किमी अंतरावर असलेल्या नवरगाव सायटोला येथे मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास रानटी हत्तींनी शेतकर्‍यांच्या घरा समोरील धानाचे पोते व गांडूळ खत प्रकल्पाची नासधूस केल्याची माहिती असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .
भंडारा जिल्ह्यातुन रानटी हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातून प्रवास करत कुरखेडा तालुक्यात पोहचला आहे. या दरम्यान हत्तींनी शेतकऱ्यांच्या शेतातील धान पुंजण्याचे नुकसान केले. तसेच आता कुरखेडा तालुक्यातील नवरगाव येथील माजी सरपंच धुर्वे यांनी धानाचे ५० पोते घरा बाहेर ठेवले असता हत्तींनी त्यांची नासधूस करून धान्याच्या शोधात घराची खिडकी फोडली व महिला बचत गटाच्या गांडूळ खत प्रकल्पाची सुद्धा नासधूस केल्याची माहिती आहे. या सर्व घटनाक्रमात सुदैवाने कोणतीच जीवितहानी झाली नाही. गावकऱ्यांनी हातात मशाल, ताट घेऊन आवाज करत हत्तींना हाकलून लावले. याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली असून वनविभागाची हत्तींना प्रवेशाने चांगलीच दमछाक होत आहे.

उमरझरी रिठ परीसरातही धुमाकूळ

कुरखेडा तालुक्याच्या सिमेवर गेवर्धा पासून ३ कीलोमीटर अंतरावर असलेल्या उमरझरी रिठ जगंलात रानटी हत्तीच्या कळपाचे आगमन करत १२ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास या परीसरातील काही शेतकऱ्यांच्या धानाच्या पूंजण्याचे नूकसान केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ओडीसा राज्यातील जगंलातून विस्थापीत झालेला हा रानटी हत्तीचा कळप मागील दोन वर्षापासून छत्तीसगड मार्गे जिल्ह्यातील कोरची, कूरखेडा, देसाईगंज तालुक्यात भटकंती करीत धूमाकूळ माजवत आहे. नूकतीच या कळपाने नजीकच्या गोंदिया व भंडारा जिल्ह्यात सुद्धा भटकंती करीत मोठा उपद्रव माजवत शेतपीकाचे नुकसान केले. परत हा कळप देसाईगंज तालूक्यात उपद्रव करीत कुरखेडा तालुक्याच्या सिमेवर उमरझरी रिठ जगंलात दाखल झाला आहे. सद्या येथेच हा कळप मूक्कामाने असल्याची माहीती प्राप्त झाली आहे. येथील काही शेतकऱ्यांच्या धान पूंजण्याची नासधूस मोठय़ा प्रमाणात या कळपाद्वारे करण्यात आली.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Kurkheda) (Zika Virus) (India-China news)(Kurkheda: Wild elephants rampage in Navragaon Saitola area)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here