कुरखेडा : महिला तलाठी म्हणते ‘मी निलंबित झाल्यास तुमच्या सर्वांची वाट लावणार, घरी येऊन आत्महत्या करेल’

1295

– महिला तलाठ्याची उपोषणकर्त्यांना फोनद्वारे धमकी
The गडविश्व
गडचिरोली , १५ मार्च : जिल्हाभरात अवैधरित्या गौण खनिज प्रकरण ताजे असतांनाच जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील कुंभीटोला येथील अवैध रेती उपसा, विटभट्टी प्रकरण अधिक तापले असून या विरोधात कुरखेडा तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांना महिला तलाठी ‘मी निलंबित झाल्यास तुमच्या सर्वांची वाट लावणार, घरी येऊन आत्महत्या करेल’ अशी फोनद्वारे धमकी दिल्याने आता एकाच खळबळ उडाली असून याप्रकरणी उपोषणकर्त्यांनी कुरखेडा पोलीस ठाण्यात ध्वनिफीतसह लेखी तक्रार दाखल केली आहे.
मागील काही दिवसांपासून कुरखेडा तालुक्यातील कुंभीटोला अवैध रेती उपसा व गावात असलेल्या अवैध वीटभट्टी धारकांवर निवेदन देऊन कारवाई करण्याची विनवणी गावकऱ्यांनी केली मात्र त्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने शेवटी उपोषणाचे शस्त्र हाती घेत सोमवार १३ मार्च २०२३ पासून कुरखेडा तहसील कार्यलयासमोर कुंभीटोला येथील चेतन गहाणे व राजू मडावी हे उपोषणास बसले. एकंदरीत “The गडविश्व” न्यूज ने सुरुवातीपासूनच हा मुद्दा हाती धरून लावला असून यापूर्वीही याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. तसेच वीटभट्टी बाबत मुदतबाह्य जाहीरनामा प्रकाशित करण्याच्या महसूल विभागाच्या अजब गजब कारभाराबाबत “आधी बाळंतपण नंतर बारस्याचे निमंत्रण, महसूल विभागाचा अजब कारभार चर्चेत” या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. आपल्यावर कारवाईची टांगती तलवार असल्याचे लक्षात येताच महसूल विभागाने हा अजब गजब कारभार घडवून आणला. मात्र त्यावर काहीही न होता व त्याला न जुमानता गावकऱ्यांनी उपोषणाचा इशारा देत १३ मार्च २०२३ पासून उपोषणाला बसले. उपोषणाला बसल्यापासून अद्याप कोणतीही कारवाई केलेल्या मागणीवर झाली नाही केवळ उपोषण मागे घेण्यात यावे अशी विनवणी उपोषणकर्त्यांना केल्या जात असल्याचे कळते. असे असतांना आपल्यावर कारवाई होणार असेल कळताच संबंधित महिला तलाठी यांनी उपोषणकर्त्यांना ‘मी निलंबित झाल्यास सर्वांची वाट लावणार, घरी येऊन आत्महत्या करेल’ अशी फोनद्वारे धमकी दिली.  दोघांतील संभाषणाची ध्वनिफीतदेखील असून यात ती महिला तलाठी धमकी देत असल्याचे स्पष्ट ऐकू येत आहे. यामुळे आता पुन्हा प्रकरण चांगलेच तापले आहे. याबाबत उपोषणकर्त्यांनी कुरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढे प्रकरण किती तापणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (GPT-4) (Bihar Board 12th Result 2023) (Poco X5 5G) (Sameer Khakhar) ( Imran Khan) (Lawrence Bishnoi) (Adani Enterprises) (Northern Lights) (Inter Milan) (Kurkheda) (Kumbhitola) (women Talathi gadchiroli kurkheda)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here