– शेतकऱ्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा (चेतन गहाने), दि. १४ : तालुक्यातील मौशी येथील २ शेतकऱ्यांचे मौशी-कूरखेडा या मुख्यमार्गालगत असलेल्या साडे चार एकर शेतजमीनीतील धानाचे पूंजणे अद्याताने पेट्रोल टाकत जाळल्याची घटना गुरुवार १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. यात शेतकऱ्याचे जवळपास २ लाखाचे नुकसान झाले आहे असून याबाबत पोलीस स्टेशन कुरखेडा येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मौशी येथील शेतकरी तथा पोलीस पाटील असलेले टिकाराम सहारे यांच्या दिड एकर शेतातील दोन धान पुंजने तर आनंदा माधव बोदेले या शेतकऱ्याचे ३ एकर शेतजमीनीतील दोन धानाचे पुंजने अद्यात आरोपीने पेट्रोल टाकून जाळले. रात्री पूंजने पेटत असल्याचे गावकऱ्यांना दिसताच त्यांनी घटणास्थळाकडे धाव घेतली तसेच नगरपंचायत कुरखेडा येथील अग्नीशमन वाहनाला सूचणा केली. रात्री १२ वाजताच्या सुमारास अग्नीशमन वाहन घटणास्थळी दाखल झाले यावेळी आगीला विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला मात्र उशीर झाल्याने पुंजने पूर्ण जळून खाक झाले. आज सकाळी घटणास्थळावर पेट्रोलची रिकामी बाटल आढळून आल्याने अद्यात आरोपीनेच पुंजने जाळले असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस स्टेशन कुरखेडा येथे अद्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे घामाने पिकविलेले धान क्षणात नष्ट झाल्याने शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolinews #gadchirolipolice #kurkheda #accidentpolicy #postoffice #muktipath )