– आरोपीचा शोध सुरू
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ०९ : तालुका मुख्यालय पासून ०५ किमी अंतरावर असलेल्या चिखली येथील एका युवकाची तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर वार करून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मृतकाची ओळख पटलेली असून जितेश भोवनदास पगडवार (वय २८ ) असे त्याचे नाव आहे.
सदर घटनेबाबत मृतकाचे नातेवाईकांनी कुरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची चक्रे फिरवीत गावातीलच संशयीतांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर हत्या नेमकी कोणी केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तर मृतकाचे काही दिवसांपूर्वी गावातील काही नागरिकांसोबत विवाद झाला होता अशीही चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींचा शोध घेणे आता पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews #crimenews )