– मजुरी बँक खात्यात जमा करण्याची निवेदनातुन मागणी
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ५ मे : पंचायत समिती धानोरा अंतर्गत अनेक गावातील राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत केलेल्या कामाच्या मजुरीचे पैसे मागील तीन महिन्यापासून मजुरांना न मिळाल्याने सदर कुटुंबावर उपासमारीची पाळी आली असल्याने सदर मजुरांची मजुरी बँक खात्यात त्वरित जमा करण्याच्या मागणीचे निवेदन संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती धानोरा यांना गुरुवार ४ मे रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मोहगाव, दुर्गापूर, पेंढरी, सावंगा, पयडी सोबतच इतर ग्रामपंचायत मधील अनेक ठिकाणी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत मजगीचे माती काम करण्यात आले. परंतु रोजगार हमी कायद्यानुसार काम केल्यानंतर केलेल्या कामाचा मोबदला ( मजुरी) पंधरा दिवसात खात्यात जमा होणे आवश्यक आहे. परंतु मजगी चे काम केलेल्या मजुरांच्या खात्यात तीन महिने उलटूनही मजुरीची रक्कम जमा झालेली नाही. मजुरांचे पैसे खात्यात जमा न झाल्याचे कारण रोजगार सेवक डी पी टी,ए बी, पी एस प्रक्रिया पूर्ण झालेली नाही असे सांगतात आणि ग्रामीण भागातील मजुरांना नाहक शारीरिक व मानसिक त्रास देऊन या प्रक्रियेत लोकांना अडकवण्याचे काम रोजगार सेवक करीत आहेत. खेड्यातील लोकांना खरिपातील धानाची कापशी, मळणी, सोडल्यानंतर दुसरे मजुरीचे कोणतेही साधन नाही ते सर्वस्वी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामावर अवलंबून असतात आणि त्यातून मिळालेल्या रकमेतूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असतो. परंतु तीन महिने पूर्ण होऊनही मजुरीची रक्कम न मिळाल्याने कुटुंबावर उपासमारीची पाळी आलेली असल्याने मजुरांच्या खात्यात त्वरित रक्कम जमा करण्याची मागणी परमेश्वर गावडे, उत्तम आतला, विकास आतला, देवनाथ टेकाम, दिलीप झुरी, रामदास आतला, लोमेश नरोटे,कोदू आतला, लक्ष्मण आतला, काशिनाथ गावडे, दिनेश टेकाम यांनी माननीय संवर्ग विकास अधिकारी धानोरा यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
(the gdv) (the gadvishva) (gadchiroli dhanora) (rojgar hami)