– २०१७ साली पोलीस दलात निवड झालेल्या संदिप गाडीवर यांची यशोगाथा
– संदिप ची खडतर प्रवासातून गडचिरोली पोलीस दलात निवड
सर्वांचे काहीतरी स्वप्न असतेच. कुणाला डॉक्टर व्हावं वाटतं, कुणाला इंजिनीयर, पण माझ स्वप्न होत “पोलिस”. मला लहानपणापासून पोलिस व्हायची इच्छा होती.
मी चामोर्शी तालुक्यातील छोट्याशा असलेल्या घोट या गावात राहत होतो व माझे १२ वी पर्यंत चे शिक्षण घोट येतील जिल्हा परिषद शाळेत झाले.
वयाच्या २० व्या वर्षी २०११ ला मी पहिली गडचिरोली पोलिस भरती दिली व त्यात मला अपयश आले. त्याचे कारण असे होती की, कसलेही मार्गदर्शन माझ्याकडे नव्हते. यशस्वी होण्याकरिता मार्गदर्शनाची खूप आवश्यकता असते. अशीच मी पुन्हा एक भरती दिली कुणाचेही मार्गदर्शन नाही आणि आले ते अपयश. मी एका गरीब कुटुंबातून होतो. पैसे कमविण्याचे थोडे दडपण होते. त्यामुळे मी २०१३ मध्ये माझे पोलिस बनण्याचे स्वप्न सोडून पुणे येथे कंपनीमध्ये कामाकरीता गेलो. जवळपास ३ वर्षे मी पुणे ला राहिलो पण माझे मन काही लागेना. कारण मन होत ते गडचिरोली पोलीस मध्ये नौकरी करण्याचे.
त्यानंतर २०१६ मध्ये पुणेहून परत आलो. लगेच भरती निघाली होती त्यामुळे ती भरती दिली पण त्यावर्षी ही मी पुन्हा अपयशी झालो. घरच्यांनी मला परत पुणे ला जाऊन काम कर म्हणत होते. कारण घरची आर्थिक परिस्थिती बळकट नव्हती. त्यावेळेस २०१७ ला पुन्हा भरती होणार होती. त्यामुळे मी घरच्यांना एक शेवटची संधी मागितली व त्यांनीही मला साथ दिली. पण आता यावेळेस मला गावात राहून भरतीची तयारी करायची नव्हती. मला गडचिरोलीला जायचे होते. माझ्या घरच्यांनी काहीही विचार न करता मला गडचिरोली ला जाण्याकरिता होकार दिला व आम्ही पैसे पुरवू असे ते म्हटले. २०१६ च्या नोव्हेंबर मध्ये मी गडचिरोलीला आलो. मी गडचिरोली मध्ये आल्यानंतर पहिल्याच दिवशी मला ‘लक्ष्यवेध अकॅडमी’ चा बॅनर दिसला. लगेच त्यावर असलेल्या राजीव खोबरे सर यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला व त्यांची भेट घेतली आणि ती भेट अशी होती की, त्या एका भेटीमुळे आज माझे आयुष्यच पूर्णता बदलून गेले आहे अशी ती भेट होती.
राजीव सरांनीच मला राहण्याकरिता स्वस्त खोली बघून दिली व मैदानी चाचणी करिता गुलाब मेश्राम सरांची अकँडमीमध्ये प्रवेश घेण्यास सांगितले. राजीव सर लेखी चाचणीचे एक उत्तम व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या सोबतीला असलेले शेट्टे सर ते सुद्धा छान शिकवत. मी मन लावून लेखी व मैदानी ची तयारी करू लागलो. फेब्रुवारी -मार्च २०१७ मध्ये भरती निघाली, मैदानी चाचणीचा दिवस आला. मला मैदानी चाचणी मध्ये ८८ मार्क मिळाले ते अपेक्षेपेक्षा कमी होते.
त्यानंतर पहिल्यांदा मैदानी ची कटऑफ लिस्ट लागली ती ९० वर मी पूर्णपणे खचून गेलो कारण मला ८८ मार्क्स पडले होते. यावेळेस ही अपयश आले असे विचार करून माझे स्वप्न काही पूर्ण होणार नाही असे विचार मी करू लागलो कारण यानंतर भरती कदाचित मी देऊ शकलो असतो किंवा नाही हे त्याची शक्यता कमीच होती. राजीव सरांनी मला म्हटले की लिस्ट बदलू शकते तू हरलास असा समजू नको. पण माझे मन आता काही तिथे लागत नव्हता व मी परत पुणे जाण्याचा विचार करून गावी परत निघून आलो.
आता मी पुणे ला जायची तयारी करू लागलो. काही दिवसांनंतर राजीव सरांनी मला फोन केला व त्यांनी मला लिस्ट बदलली आहे तू लेखी साठी पात्र झाला आहे अशी माहिती दिली. त्यावेळेस मला खूप आनंद झाला व घरचे सुध्दा आनंदी होते. आता ही संधी सुटली नाही पाहिजे असे म्हणत माझ्या आईवडिलांनी मला पुन्हा गडचिरोली जाऊन लेखी चाचणी ची तयारी करण्यास सांगितले. त्याचदिवशी मी परत गडचिरोलीला आलो व राजीव सरांची भेट घेऊन लक्ष्यवेध अकॅडमी मध्ये सरांच्या मार्गदर्शनात अभ्यास करू लागलो. लेखी चाचणी साठी मी खूप मेहनत केली. सरांना पण माझ्यावर खूप विश्वास होता की, मी यावेळेस पोलिस बनणारच. लेखी चाचणीचा दिवस आला. त्या चाचणीत मला ७७ मार्क्स मिळाले आणि माझे एकूण मार्क्स झाले ते १६५ आणि लिस्ट लागली ती १६३ वर. त्या भरतीत माझी निवड झाली. राजीव सर आणि त्यांच्या ‘लक्ष्यवेध अकॅडमी’ मुळे आज माझे स्वप्न पूर्ण झाले.
यश मिळवण्यासाठी मेहनत करावी लागतेच पण मार्गदर्शनाची सुध्दा खूप गरज असते. असे मार्गदर्शक मला मिळाले मी त्यांचा नेहमीच आभारी राहणार. पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांनी मेहनत करत राहावे, सातत्य ठेवावे यश नक्कीच तुमच्यापुढे लोटांगण घालेल.
- संदिप अरुण गाडीवर
पो. अं. गडचिरोली २०१७
#The Gadvishva #lakshyvedh AcademyGadchiroli #Gadchiroli #sandip Gadivar #police Bharti