The गडविश्व
गडचिरोली, १६ जानेवारी : तालुका विधी सेवा समिती,धानोरा तर्फे तालुक्यातील गिरोला येथे ग्रामपंचायत सभागृहात १४ जानेवारी २०२३ रोजी दिशा योजने अंतर्गत कायदेविषय शिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष आर.आर.खामतकर, अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती धानोरा,तथा दिवाणी न्यायाधिश,( कनिष्ठ स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी धानोरा हे होते, प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून कोमलवार अति.संवर्ग विकास अधिकारी, पं.स. धानोरा, राहुल गावडे, पॅनल अधिवक्ता ता.वि.से.स.धानोरा, चौधरी,पोलीस उप निरिक्षक, पो.स्टे. चातगाव, करंगामी, महिला व बाल संरक्षण अधिकारी, धानोरा, यु.एम.मडावी,अधिवक्ता, सौ. जांभुळकर मॅडम, ग्रामसेविका, गिरोला, गावातील सरपंच, उपसरपंच हे उपस्थीत होते. गिरोला गावांची संख्या अंदाजे ७०० आहे. कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष प्रमुख पाहुणे मार्गदर्शकांनी दिशा योजनेला अनुसरुन आपआपल्या क्षेत्रातील कायदयांशी निगडीत कायदेविष्यक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला उपस्थीत ९५ लोकांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घेतला.
(The Garvishva) (Gadchiroli News Updates) (PSG) (Australian Open) (The Last of Us TV series) ( Khashaba Dadasaheb Jadhav) (Chhatrapati Sambhaji Maharaj) ( Russia • Yakutsk • Siberia • Cold wave) ( Pongal • Mattu Pongal)