पोष्टाने घरपोच मिळणार निवृत्तीधारकांना हयातीचे प्रमाणपत्र

559

The गडविश्व
गडचिरोली, ३० नोव्हेंबर : शासनाच्या विविध सुविधा आणि सेवानिवृत्तधारकांना पेन्शन मिळविण्यासाठी दरवर्षी डिसेंबरपूर्वी हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्यासाठी त्यांना नाहक त्रास होत होता.परंतु आता हे प्रमाणपत्र पोस्टनकडून घरपोच किंवा पोस्ट कार्यालयातून मिळविण्याची सुविधा डाक विभागाने उपलब्ध करुन दिली आहे. नो टेन्शन फॉर पेन्शन हे पोहोचविण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
पोस्टात किंवा पोस्टमनकडून मिळणार प्रमाणपत्र:- हयातीचे (लाईफ सर्टिफिकेट) प्रमाणपत्र आता पोस्टातून आणि घरपोहोच सुध्दा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यासाठी डाक विभागाच्या 0712-2520940 या क्रमांकावर संपर्क साधल्यास पोस्टमन हयातीचे प्रमाणपत्र पेन्शनधारकांना घरपोच उपलब्ध करुन देणार आहे.

कशासाठी लागते हयातीचे प्रमाणपत्र

केंद्र आणि राज्य शासनाचे निवृत्तीवेतनधारक तसेच महामंडळातील सेवनिवृत्त कर्मचारी आदींना पेन्शन मिळविण्यासाठी दरवर्षी डिसेंबरपूर्वी हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. याशिवाय विविध शासकीय सवलतींचा लाभ घेण्यायाठीसुध्दा या प्रमाणपत्राची गरज भासते.

आवश्यक कागदपत्रे

हयातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ज्या बँकेतून पेन्शन मिळते त्या बँकेचे नाव,आधारकार्ड क्रमांक आणि पेन्शन पेमेंट ऑर्डर या तीन बाबी महत्वाच्या आहेत. या तीन बाबींची पूर्तता केल्यास संबंधित व्यक्तीला घरपोहोच हयातीचे प्रमाणपत्र डाक विभागाच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

इतके रुपये शुल्क

हयातीचे प्रमाणपत्रासाठी सेवानिवृत्तीधारकांना जीएसटीसह ७० रुपये द्यावे लागतात. पंरतु इंडिया पोस्ट बँकेचे प्रिमिअम अकाऊंटधारकांना यात ५० टक्के सूट देण्यात येत असून,हे अकाऊंट असल्यास केवळ ३५ रुपये भरुन हयातीचे प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

घरपोच हयातीचे प्रमाणपत्र सुविधेचा लाभ घ्यावा

डाक विभागाच्या वतीने पेन्शनधारकांना घरपोच हयातीचे प्रमाणपत्र पोहोचविण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.तरी संधीचा लाभ घ्यावा असे अधिक्षक पोस्ट कार्यालय,चंद्रपूर यांनी कळविले आहे.

( life certificate) (Post Office)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here