The गडविश्व
आरमोरी, २७ नोव्हेंबर : ग्रामीण विकास शिक्षण संस्था द्वारा संचालित लिसिट हायस्कूल ठाणेगाव येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.
संविधान दिन कार्यक्रमानिमित्त गावात सविधान दिन जागरूकता फेरी काढण्यात आली. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात संविधानाचे महत्त्व, गरज, संविधान निर्मितीचा इतिहास तसेच पारतंत्र्य ते स्वातंत्र्य काळादरम्यान संविधान निर्मितीत झालेल्या प्रमुख घडामोडींची माहिती देण्यात आली, तसेच भारतीय राज्यघटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निमित्ताने विशेष योगदान बद्दल माहिती देण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापिका कुमारी अर्चना साळवे, प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक कांबळे, ठेंगरी, डीवले, मेश्राम, मानकर, स्नेहल मेश्राम उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आक्रोश शेंडे यांनी केले.
#The Gadvishva #Armori #thanegao #lisit Highschool #Constitution Day