The गडविश्व
गडचिरोली, ४ सप्टेंबर : शासन निर्देशानुसार प्रकल्पातंर्गत कार्यरत शासकीय आश्रमशाळा येथील मंजुर पदांपैकी रिक्त असलेल्या शिक्षक संवर्गातील पदावर नविन नियुक्ती होईपर्यंत रोजंदारी/तासिका तत्वावर यापुर्वी काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांमधून नियुक्ती देणेबाबत निर्देश कार्यालयास प्राप्त झाले. यावर्षी (सन 2023-24 मध्ये प्रथम सत्रांकरीता) रोजंदारी/तासिका तत्वावर शिकवणीचे काम करीत असलेले रोजंदारी/तासिका शिक्षक वगळून उर्वरीत कार्यालयीन दस्ताऐवजातील रोजंदारी/तासिका तत्वावर यापुर्वी निर्गमित केलेल्या आदेशानूसार रोजंदारी/तासिका तत्वावर शिकवणीचे काम केलेल्या 40 उमेदवारांची यादी तयार करण्यात आलेली आहे.
40 उमेदवारांची यादी डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
सदरच्या 40 उमेदवारांच्या यादीमध्ये ज्यांचा समावेश झालेला नसेल त्यांनी सदर जाहिरनामा प्रकाशित झाल्याच्या दिनांकापासून १४ दिवसांचे आत प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी, जि.गडचिरोली कार्यालयास आक्षेप सादर करण्यात यावीत. अन्यथा आपले काहिही म्हणणे नाही असे गृहित धरुन शासन पत्रानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. याची नोंद घ्यावी असे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी जि.गडचिरोली यांनी कळविले आहे.