-१६ संघानी घेतला सहभाग, विजेत्यांना पुरस्कार वितरण सोहळा
The गडविश्व
गडचिरोली, २६ मार्च : जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील पुरसलगुंडी ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या बांडे येथे २१ ते २४ मार्च २०२३ या चार दिवसीय क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.
लायड्स मेटल्स तर्फे प्रथम पारितोषिक २५,००० व द्वितीय पारितोषिक २०,००० तर तृतीय पारितोषिक १५,००० देण्यात आले. तिसऱ्या दिवशी बक्षिस वितरण सोहळाचे आयोजन करण्यात आले. बक्षीस वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सैनू गुंडरू पोलीस पाटील, साधु गुंडरू भुमिया, दयालु खुजूर, ग्रामपंचायत सदस्य, श्रीमंती निर्मला गुंडरू ग्राम पंचायत सदस्य साधु उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी प्रथम पारितोषिक पुरसलगुंडी, द्वितीय पारितोषिक बांडे, तृतीय पुरस्कार हेड्री संघाला वितरण करण्यात आले. तर अंतिम सामनात सर्वोत्कृष्ट फलंदाज दिपक (बांडे), सर्वोत्कृष्ट गोलंदाज अंकुश ( पुरसलगुंडी ), सामनावीर अंकुश (पुरसलगुंडी), मलिकावीर सौरव (हेड्री) यांनाही बक्षीस देण्यात आले. यावेळी प्रतिष्ठीत नागरिक पुसू दुर्वा, रैनू गुंडरू, पेका गुंडरू,रामजी गुंडरू, मरकूस तिगा व इतर नागरिक उपस्थित होते.