-संतप्त शेतकरी रास्ता रोको आंदोलन करणार
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि.०७ : तालुक्यातील तळेगांव व अंतरगाव परीसरातील लोड शेडिंग अचानक ४ तासावरून १२ तास करण्यात आल्याने शेतकऱ्यांचे नियोजन चुकत रब्बी धान पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज उपविभागीय अधिकारी कार्यालय कुरखेडा येथे धडक देत येथील विद्युतत पुरवठा पूर्ववत करण्यात न आल्यास ११ मार्च रोजी कुरखेडा-वडसा मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदन देत केला आहे
तालूक्यातील तळेगांव फिडर वर व अंतरगाव सब स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खेडेगांव, पुराडा व रामगड फिडर वर यापूर्वी दिवसातून फक्त सकाळी २ तास व सांयकाळी २ तास लोड शेडिंग करण्यात येत होती. या अनूषगांने नियोजन करीत या परीसरातील शेतकऱ्यांनी रब्बी धानाची लागवट केली, मात्र कोणतीही पूर्वसूचणा न देता ६ मार्च पासून येथील लोड शेडिंग ४ तास वरून १२ तास करण्यात आल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडत रब्बी धान पीक धोक्यात आले आहे. त्यामूळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आज काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह उपविभागीय अधिकारी कार्यालय व विद्युत वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयावर धडक देत निवेदन दिले व तात्काळ विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात न आल्यास ११ मार्च रोजी कूरखेडा-वडसा मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला.
यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष जीवन नाट, जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे, माजी जि.प.सदस्य प्रभाकर तूलावी, माजी पं.स सभापती गिरीधर तितराम, शेतकरी परसराम हलामी, वासूदेव दरवडे,भुमेश्वर सोनवाने, ग्यानचंद सहारे व मोठ्या संख्येत शेतकरी हजर होते.