The गडविश्व
गडचिरोली, दि.०६ : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे ०२ मार्च, २०२४ रोजी “विधी सेवा व शासकीय योजनांचा महामेळावा” चे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून न्यायमुर्ती एम. डब्ल्यु. चांदवानी, मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, नागपूर तथा पालक न्यायमुर्ती, गडचिरोली तसेच ए. एन. करमरकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली, कुमार चिंता, अतिरीक्त पोलीस अधिक्षक, गडचिरोली, यु. एम. मुधोळकर, जिल्हा न्यायाधिश-१ तथा अतिरीक्त सत्रन्यायाधिश, गडचिरोली, धनाजी पाटील, प्रभारी अतिरीक्त जिल्हाधिकारी, गडचिरोली, आर. आर. पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली, एस.सोलंकी, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक, गडचिरोली तसेच गडचिरोली येथील न्यायीक अधिकारी, उपस्थित होते. कार्यक्रमाचा मुख्य हेतू कायद्याबाबतची माहिती प्रत्येकांना व्हावी तसेच शासनाच्याविविध योजनांचा प्रसार प्रचार व्हावा. शासनाच्या विविध विभागातील विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने महाशिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचा शुभारंभ व्यासपिठावरील उपस्थित मान्यवरांनी दिप प्रज्वलन करून केला. तसेच मान्यवरांचे स्वागत गीतांनी स्वागत करण्यात आले तद्नंतर राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवाप्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समिती मार्फत विधी सहाय्य व सल्ला देणेकरीता कशाप्रकारे सहकार्य करते हे नालसा गिताचा व्हिडीओ मार्फत उपस्थितांना दाखविण्यात आले.
प्रास्ताविक भाषणात आर. आर. पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांनी विधी सेवा व शासकीय योजनांचा महामेळावा से आयोजना मागील उद्देश काय होता याबाबत सांगितले तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणांमार्फत मनोधैर्य योजना बळी पडलेल्यांना नुकसान भरपाई योजना, मोफत विधी सहाय्य तसेच तुरुंगात बंदिस्त बंदयांकरीता सुध्दा मोफत विधी सहाय्य पुरविल्या जात असते. तसेच मोफत विधी सहाय्य किंवा सल्ला घ्यावयाचा असल्यास अवश्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली येथे भेट देणेबाबत उपस्थितांना आवाहन केले. कुमार चिंता, अतिरीक्त पोलीस अधिक्षक, गडचिरोली यांनी पोलीस विभागामार्फत नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना पोलीस विभागामार्फत अनेक योजनासुरू करण्यात आलेल्या आहेत याची माहिती दिली. तसेच प्रत्येक पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्रामार्फत सुध्दा विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याबाबत सांगितले. दादालोरा खिडकी, भरोसा सेल, पोलीस भर्ती पुर्व प्रशिक्षण, मोटार ड्रॉयव्हिंग प्रशिक्षण तसेच विविध प्रशिक्षण उपलब्ध करण्यात आले असल्याबाबत उपस्थितांना माहिती दिली. त्यामुळे ज्यांना प्रशिक्षणाचा लाभ घ्यावयाचा असेल अशा व्यक्तींनी जवळच्या पोलीस स्टेशन किंवा पोलीस मुख्यालयात येवून संपर्क साधावा असे आवाहन उपस्थितांना केले. आशुतोष एन. करमरकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांनी कार्यक्रमाचे आयोजना मागील उद्दीष्ठ सांगितले तसेच विविध विभागांच्या योजना अशाप्रकारच्या शिबिरामार्फत जनतेपर्यंत पोहोचतात त्यामुळे अशा कार्यक्रमाचा नक्कीच फायदा होत असतो तसेच विविध विभागांनी लावलेल्या स्टॉल ला प्रत्येकानीच नक्कीच भेट द्यावी व त्या-त्या विभागातील योजनेची माहिती घ्यावी व विकसित भारत निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.
न्यायमुर्ती एम. डब्ल्यु, चांदवानी, उच्च न्यायालय मुंबई, नागपूर खंडपीठ नागपूर तथा पालक न्यायमुर्ती गडचिरोली यांनी सर्व उपस्थितांना शासनाच्या योजनांचा लाभ घेवून स्वत:चा विकास करून घ्यावा. जिवनमान सुधारावे व मुख्य प्रवाहात यावे असे आवाहन केले. प्रमाणपत्र, उज्वला कार्यक्रमानिमित्त विविध विभागामार्फत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, गॅस योजनेअंतर्गत शेगडीचे वाटप, सायकल वाटप, टॅब वाटप, फवारणी यंत्र वाटप, पोलीस भर्ती प्रशिक्षणार्थीना अभ्यासाकरीता पुस्तके वाटप, धनादेश वितरण तसेच विविध शासकीय विभागामार्फत लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मान्यवरांचे शुभ हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास गडचिरोली तालुक्यातील नागरिक तसेच विविध शासकीय विभागांचेअधिकारी/कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर तसेच विद्यार्थी असे बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती. एन.सी. सोरते, तृतिय सह दिवाणी न्यायाधिश(क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, गडचिरोली यांनी केले तर आभार सी. पी.रघुवंशी, सह दिवाणी न्यायाधिश (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, गडचिरोली यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीच्या संपूर्ण कर्मचा-यांनी अथक परिश्रम घेतले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #bharosasel )