महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना तालुका शाखा गडचिरोली कार्यकारिणी गठीत

356

The गडविश्व
गडचिरोली, दि.११ : स्थानिक धानोरा मार्गावरील आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्था येथे मा.बापूभाऊ मुनघाटे जिल्हा सरचिटणीस म.रा.जु.पे.हक्क संघटना गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार ९ डिसेंबर रोजी सभा घेण्यात आली. दरम्यान यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना तालुका शाखा गडचिरोली कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
यावेळी जगदीश मडावी अध्यक्ष म.रा.जु.पे.हक्क संघटना शाखा तालुका गडचिरोली, सागर आत्राम म.रा.जु.पे.हक्क संघटना शाखा तालुका गडचिरोली, गजानन गेडाम अध्यक्ष (शहर ) गडचिरोली, कैलाश कोरोटे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, कु.अन्नपूर्णा सिडाम वन रक्षक ब्रम्हपुरी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
यामध्ये प्रथम १२ डिसेंबर पेन्शन जनक्रांती महामोर्चा आणि पेन्शन मामा, सोनार मामा यांचे २० जिल्ह्यामध्ये पेन्शन बाईक भ्रमन होत असून ते १० डिसेंबर ला गडचिरोली येथे येत असल्याने त्यांचा स्वागत व सत्कार करिता नियोजन करण्यात आले. त्यानंतर कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यात महिला उपाध्यक्षा कु वासंती देशमुख,
उपाध्यक्ष छत्रपती शंकरवार, कार्याध्यक्ष हेमंत माटे, कार्यकारी कार्याध्यक्ष खुमेंद्र मेश्राम, सहसचिव कुलभूषण हेमके, कोषाध्यक्ष उसन सिडाम, महिला संघटिका कु.माधुरी कुमरे, प्रवक्ता सचिन मेश्राम, प्रसिद्धी प्रमुख गौतम पुंडगे, सल्लगार कु. सुषमा नन्नावरे, केंद्र संघटक दशरथ चलाख – केंद्र मुरखडा, कु.नालंदा इंदूरकर केंद्र आंबेशिवणी, अमरदीप भुरले- बोदली, राहुल खोब्रागडे-आमिर्झा, सिद्धार्थ भैसारे – येवली, दिनेश सहारे -काटली, कु.आर.आर.दाते केंद्र – गुरवडा, दिनेश वाघमारे – पोटेगाव. यावेळी सर्व नियुक्त कार्यकारिणी चे पुष्पगुछ देऊन सत्कार करून शुभेच्छा देण्यात आले.
सर्व कार्यकारिणी गठीत करिता समीर भजे माजी सचिव गडचिरोली यांनी परिश्रम घेतले तर सभेचे संचालन खुमेद्र मेश्राम तर आभार कुलभूषण हेमके यांनी मानले.
सदर सभेला बापू मुनघाटे मा. रा.जु.पे.ह सचिव गडचिरोली, जगदीश मडावी अध्यक्ष तालुका गडचिरोली, सागर आत्राम सचिव तालुका गडचिरोली, समीर भजे माजी सचिव गडचिरोली, गौतम पुंडगे, कुलभूषण हेमके, खुमेद्र मेश्राम, हेमंत माटे, प्रवीण घरत, उसन सिडाम, दशरथ चलाख, कु.आर,आर, दाते, कु. अन्नपूर्णा सिडाम, कैलास कोरोटे, प्रकाश सावंत, कु. माधुरी कुमरे, अमरदीप भुरले, गजानन गेडाम, शहर अध्यक्ष, छत्रपती शंकरवार, रमेश काळबांधे, सचिन मेश्राम व इतर पेन्शन शिलेदार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here