The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २ ऑक्टोबर : तालुक्यातील माळंदा येथील जय पेरसापेन हायस्कूल मध्ये महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा करण्यात आली.
“स्वच्छता ही सेवा (SHS)” अंतर्गत १ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता “एक तारीख-एक घंटा”(एक तारीख एक तास) हा उपक्रम राबविण्यात आले. व २ ऑक्टोबर २०२३ ला “महात्मा गांधी”यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात”राज्य गीताने करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक ए.एन.बढई यांनी भुषविले. अध्यक्षांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून व्दिप प्रज्वलित केले. सर्व विद्यार्थ्यांना महात्मा गांधी जयंती दिनानिमित्त मार्गदर्शन केले. तसेच शाळेतील वर्ग १० वी तील कु.भारती रमेश धुर्वे, कु.वैष्णवी धनिराम गावडे, कु.कशिष शामराव दुगा, देखील महात्मा गांधींच्या जिवनावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक कु.भारती रमेश धुर्वे वर्ग १० वी तर संचालन कु.वैष्णवी धनिराम गावडे वर्ग १० वी हीने केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कु.ए.बी.शेख, एल.डब्ल्यू. धुडसे, सी.डी.गद्देवार, एस.पी.मारकवार, जी.एन.ठमके, ए.एस.संतोषवार यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार कु.नंदनी रामदास मडावी वर्ग ९ वी हीने केल. तसेच कार्यक्रमाला शाळेतील संपूर्ण विद्यार्थी उपस्थित होते.