The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, १६ जुलै : महात्मा गांधी तंटामुक्त समिती गेवर्धाच्या पुढाकारातून प्रेमीयुगला विवाहबंधनात अडकले आहे. बादल मनोज लोणारे मु.पो.रामगड ता.कुरखेडा असे वराचे नाव आहे तर ट्विंकल जयंतकुमार काटेंगे मु.पो.रांगी ता.धानोरा असे वधूचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, बादल आणि ट्विंकल चे कुरखेडा येथे शिक्षण घेत असताना ४ वर्षांपूर्वी ओळखी झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि शेवटी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी तंटामुक्त समिती गेवर्धा पदाधिकारी यांची भेट घेऊन लग्न लावून देण्याची विनंती केली. तंटामुक्त समितीने यासंदर्भात दोघांच्या कागदपत्रांची शहानिशा करून आज शुक्रवार १४ जुलै रोजी सायंकाळी ६:०० वा. तंटामुक्त समिती पदाधिकारी, गावकरी यांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह पार पाडण्यात आला.
याप्रसंगी सरपंचा सुषमा मडावी, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजु बारई, ग्रा.पं. सदस्य रोशन सय्यद, पो.पा. भाग्यरेखा वझाडे, तंटामुक्त समिती सदस्य राजेंद्र कुमरे, जावेद शेख, सुधीर बाळबुद्धे, प्रभाकर कुळमेथे, अविनाश भणारे, पत्रकार ताहीर शेख, ग्रा.पं. कर्मचारी कृष्णा मस्के, दिनेश कावळे व गावकरी उपस्थित होते.