The गडविश्व
ता. प्र/ आरमोरी, दि. १२ : सामाजिक आणि महिला हक्कांसाठी कार्य करणारे थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने १०१ एप्रिल रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बजरंग दलाचे अध्यक्ष कमलेश ठाकरे यांनी भूषवले. यावेळी उपाध्यक्ष अक्षय सहारे, महेश राऊत, आकाश राऊत, मुन्ना कांबळे, शूरवीर गुरनुळे, रवी मोहरले, शाहरुख भोयर, आदित्य डोनाल्डकर, गट्टू सहारे, मंगेश कुमरे, हरी ओम राऊत, सूरज इस्टम, गुणवंत ठाकरे, रमण उईके, चंद्रशेखर कुंबरे, सुनील कहालकर तसेच इतर मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात वक्त्यांनी महात्मा फुले यांच्या विचारांचे स्मरण करून दिले आणि त्यांनी उभारलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याचे महत्त्व अधोरेखित केले. विशेषतः महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी दिलेल्या योगदानावर भर देण्यात आला.
गावपातळीवर जयंती साजरी करण्यासाठी राजकारणी बाहेरगावी गेले तरी गावातील युवकांनी पुढाकार घेऊन सामाजिक प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करणे ही विशेष बाब ठरली.
बजरंग दल यंदा विविध उपक्रम राबवत असून, ११ एप्रिल रोजी गावातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तसेच १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष पूजन कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
