चिमुर : मानेमोहाळी जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना संविधान उद्देशिकाचे वितरण

240

– मानेमोहाळी येथे संविधान दिन उत्साहात साजरा
The गडविश्व
चिमुर, २६ नोव्हेंबर : तालुक्यातील मानेमोहाळी येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतच्या वतीने जि.प. शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना संविधान उद्देशिकांचे वितरण करण्यात आले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर व घटनासमितीच्या २ वर्ष ११ महिने १८ दिवसाच्या अथक परिश्रमातून राष्ट्रासाठी घटनेची निर्मिती करण्यात आली. म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ‘भारतीय घटनेचे शिल्पकार’ असे म्हटले जाते. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेची प्रत राष्ट्राला अर्पण करण्यात आली. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.मानेमोहाळी येथे संविधान दिन साजरा करतांना ग्रामपंचायतीने एक स्तुत्य उपक्रम राबविला. ग्रामपंचायतच्या वतीने जि. प. शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना संविधान उद्देशिकाचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांसह पालकांना संविधानाचे महत्व, संविधांविषयी माहिती कळावी याकरिता ग्रामपंचायतीच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी संविधाना उद्देशिकाचे वाचन केले. यावेळी शाळेचे शिक्षकवृंद, विद्याथी व ग्रामपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते.

#The Gadvishva #chimur #chamdrpur #sanvidhan Din

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here