पाच वर्षांपासून दारूविक्रीमुक्त गाव मंजेगाव

136
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"border":1,"transform":1,"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

-पोलिस पाटील व गाव संघटनेचा पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : चामोर्शी तालुक्यातील मंजेगाव हे गाव गेल्या पाच वर्षांपासून अवैध दारूविक्रीमुक्त गाव म्हणून नावारूपास आले आहे. यासाठी पोलिस पाटील व गाव संघटनेने अथक परिश्रम घेऊन आपल्या गावातून अवैध दारूविक्री हद्दपार केली. आता आपल्या गावाला खर्रा विक्रीमुक्त करण्याचा मानस असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.
मंजेगाव हे तालुक्यापासून २५ किमी अंतरावर वसलेले आहे. या गावाच्या शेजारी असलेले हळदवाही टोला, माडे मुधोली, दरयनगुडा, गांधीनगर, मक्केपल्ली माल, नवनीतग्राम, घोट, भीमनबोडी, बेलगट्टा या गावांमध्ये चोरट्या मार्गाने अवैध दारूविक्री सुरु आहे. परंतु, मंजेगाव येथे सुरु असलेली अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी गावच्या पोलिस पाटील वर्षा गर्तूलवार व गाव संघटनेने अथक प्रयत्न करून ग्रामस्थांच्या पुढाकारातून आपल्या गावाला दारूच्या समस्येतून मुक्त केले. मागील पाच वर्षांपासून या गावातील दारूविक्री बंद असून सामाजिक व धार्मिक उत्सव शांततेत साजरे होताना दिसतात. भांडण-तंट्यांचे प्रमाण देखील खूप कमी आहे. विशेष म्हणजे सर्व मुले शिक्षण घेत असून शेजारी गावाच्या तुलनेत या गावातील विद्यार्थ्यांची पटसंख्या शाळेत अधिक आहे. दारूविक्रीमुक्तीमुळे सदर गावातील लोकांमध्ये सुख-समृद्धीचे जीवन आले आहे. ही दारूबंदी कायम टिकवून ठेवण्यासाठी गाव संघटना प्रयत्नरत असून त्या दृष्टीने अंमलबजावणी सुरु आहे. तसेच गावात खर्रा बंदीसाठी सुद्धा प्रयत्न सुरु आहेत.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here