The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २८ : स्थानिक जिल्हा परिषद हायस्कुल येथे २७ फेब्रुवारी २०२५ ला मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.
दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे जेष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी भाषा गैरव दिन साजरा करण्यात येतो. कविवर्य कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. कुसुमाग्रजांची मराठी साहित्य क्षेत्रात नाटककार, कथाकार, कांदबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून ख्याती आहे. मराठीचा सन्मान वाढविण्यासाठी, मातृभाषेचा गौरव आणि कविराज कुसुमाग्रज यांच्या स्मृतीना अभिवादन करण्याच्या हेतूने जिल्हा परिषद हायस्कुल धानोरा येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक पी. व्ही. साळवे तर प्रमुख अतिथी एन. बी. मेश्राम, पी. बी. तोटावार, ए. बी. कोल्हटकर, मोहन देवकात्ते, डॉ. रश्मी डोके, कु. रजनी मडावी, श्रीमती कांचन दशमुखे, कु.रेखा कोरेवार, सौ.प्रियंकाआनंदवार, कु.किरण दरडे, हरीश पठाण, भालेराव, बादल वरघंटीवार, कोरेटी उपस्थित होते.
कार्यक्रम चे संचालन गेडाम यांनी केले तर आभार ओम देशमुख यांनी मानले.
