मरपल्ली येथील नागरिकांना मिळणार शुध्द पिण्याचे पाणी

369

– जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते जलकुंभाचे भूमिपूजन
The गडविश्व
अहेरी, २७ नोव्हेंबर : तालुक्यातील मरपल्ली येथे जिल्हा परिषद बांधकाम विभाग गडचिरोली अंतर्गत शुद्ध पिण्याचे पाण्याची विहीर व जलकुंभ मंजूर करण्यात आले. सदर विहीर व जलकुंभाचे भूमिपूजन आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. मरपल्ली येथे गावनिर्मितीपासून जलकुंभ उपलब्ध नसून गावातील नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी मिळत नव्हते, गेल्या ७५ वर्षापासून या भागातून निवडुन आलेले लोकप्रतिनिधिकडे अनेकदा मागणी करूनही सदर समस्याचे निराकरण केले नाही. मात्र जि.प.अध्यक्ष यांच्या कडे नवीन विहीर व टाकी साठी मागणी केली असता जिल्हा परिषद बांधकाम विभागातून निधी मंजूर करण्यात आले असुन भूमिपूजन संपन्न झाले. जलकुंभ व विहीर बांधकाम करण्यात येणार असून प्रत्येक घरी नळ जोळणी करून पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या भूमिपूजन कार्यक्रमाला अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी सभापती सौ. सुरेखा आलाम, माजी पंचायत समिती सदस्या सौ. शारदा कोरेत, माजी सरपंच सीताबाई वेलादी, ग्राम पंचायत सदस्या सुनंदा आत्राम, आनंदराव कोंडागुर्ले, माजी सरपंच हनमंतू कोरेत, माजी उपसरपंच कार्तिक तोगम, प्रतिष्ठित नागरिक निलेश कूड़मेथे, बापू बेडकी, व्येंकटी कोंडागूर्ले, लचया सिडाम, शंकर कोंडागूर्ले, अशोक दिकोंडा, वासुदेव कोंडागुर्ले, श्रावण कोंडागुर्ले, वेंकटी कुमरे, मल्लेश कंनेबोईना, अमोल कोंडा, मोरेश्वर कोंडगुरले, श्रीनिवास मडावी, नानाजी.कोंडागुर्ले, केशव, गजा नन मुंजम, दिगु पेरगु व गावातील नागरिक उपस्थित होते.

Ajay Kankadalwar Marpalli Aheri Bhumipujan The Gadvishva Gadchiroli

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here