The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २५ : आपल्याला यशस्वी जीवन जगायचे असेल तर आपण आपणास येत असलेल्या कौशल्यांमध्ये निपुण असले पाहिजे आणि कौशल्य आत्मसात करण्यासाठी परिश्रमाची तयारी असली पाहिजे असे मत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दहिफळे यांनी मांडले. तेऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नामांतर समारंभ प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
धानोरा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे टिपागड गुरुबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नामांतरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे प्राचार्य लोणे, माजी पंचायत समिती सदस्य चंदू किरंगे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक लालाजी उसेंडी, सिताराम बडोदे, मुस्ताक कुरेशी, भाविकदास करमणकर, गणेश कंटीवार, मडावी, रामटेके तथा शिल्पनिदेशक आदि मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या स्वागतासाठी पारंपारिक गोंडी नृत्य सादर करण्यात आले होते. याप्रसंगी नामांतर फलकाचे मान्यवरांचे हस्ते अनावरण करण्यात आले. पुढे बोलताना डॉ.दहिफळे यांनी सदर संस्थेचा नावलौकिक वाढविण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा असे आवाहन केले. यावेळी चंदूजी किरंगे, लालाजी उसेंडी, सिताराम बडोदे आणि मान्यवरांनी समायोजित मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे संचालन शुभम देशपांडे यांनी तर आभार मौर्य यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्वसाधारण प्राचार्य मधु पवार, रामटेके, याट्टेवार,गोगले, भंडाराखे बुंदेले, पिंटू उशेंडी, आशिष दाशा कुमरे आदींनी परिश्रम घेतले.
