The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २८ : श्री.साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचलित येथील श्री.जे.एस.पि.एम महाविद्यालयात गणित विभागा मार्फत गणित दिवस 22 डिसेंबर 2023 ला साजरा करण्यात आला.
श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्ताने गणित दिवस प्रत्येक वर्षी साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने विभागामार्फत विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी रांगोळी, पोस्टर तसेंच वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला यासाठी गणित विषयांचे महत्व विषय ठेवण्यात आला. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज चव्हाण सर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तसेंच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. झाडे उपस्थित होते. तसेंच डॉ. वीना जंबेवार, डॉ. किरमिरे, डॉ वाघ, डॉ. लांजेवार, प्रा. बनसोड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सर्वं मान्यवरांनी आपले गणित विषयांचे अनुभव सांगत हा विषय दैनंदिन जीवनात महत्वाचा आहे हे सांगितले. गणित विभाग प्रमुख डॉ. प्रियंका पठाडे यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडला. या कार्यक्रम साठी विद्यार्थी उपस्थित होते तसेंच तोंडरे, पुण्यपरेडडीवर, भैसारे, गोहने, वाळके उपस्थित होते. तसेंच जीवन घोरपडे, मनोज नन्नावरे आणि राकेश बोनगीनवर, वाढणकरजी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचलन सोनम आलाम तर डॉ. प्रियंका पठाडे यांनी विभागामार्फत आभार मानले.