कुणबी समाजाचे स्नेह असेच मिळत राहो : आ. डॉ. देवराव होळी

83

– गडचिरोलीतील कुणबी मेळाव्यात उपस्थित समाज बांधवांचे मानले आभार
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : कुणबी समाजाचे  स्नेह आपणाला नेहमीच मिळाले असून असेच प्रेम आपल्यावर कुणबी समाजाने ठेवावे असे म्हणत गडचिरोली येथे आयोजत कुणबी मेळाव्याला उपस्थित समाज बांधवांचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी आभार मानले.
गडचिरोली येथे कुणबी समाज बांधव व आमदार डॉ. देवराव होळी मित्र परिवाराच्या वतीने कुणबी मेळाव्याचे आयोजन २२ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. या मेळाव्याला गडचिरोली शहर व तालुक्यातील कुणबी समाज बांधवांनी उस्फुर्त प्रतिसाद देत आपली उपस्थिती दर्शवली.
या मेळाव्याप्रसंगी सेवानिवृत्त न्यायाधीश दिलीप मस्के, प्राचार्य गोपाल मुनघाटे, वक्ते भास्करजी उरकुडे, प्राध्यापक धर्मेंद्र मुंघाटे, पंचायत समिती सदस्य रामरतन गोहने, वाकडीचे माजी सरपंच चरणदास पाटील बोरकुटे, प्रतिभाताई चौधरी, तालुका महामंत्री बंडू झाडे, गडचिरोली महिला शहराध्यक्ष कविताताई उरकुडे, महीला आघाडी तालुक्याचे अध्यक्ष अर्चनाताई बोरकुटे, वासुदेवजी बट्टे, खाशाबाजी म्हशाखेत्री पाटिल, यांच्यासह मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ.डॉ. देवराव होळी म्हणाले की, देशातील नरेंद्र मोदी व राज्यातील भाजपा शिवसेना महायुतीच्या नेतृत्वातील सरकारने ओबीसी बांधव, कुणबी समाज बांधवांसाठी अनेक योजना सुरू केल्या. मागासवर्गीय आयोगाचे गठन करून समाजाला संरक्षण प्रदान केले. पहिल्यांदाच ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू केले. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आजपर्यंत नसलेले नवीन वस्तीगृह सुरू केले. ओबीसींना स्कॉलरशिप सुरू केली, वैद्यकीय शिक्षण मध्ये २७ टक्के आरक्षण सुरू केले.  या सर्व समाजाचा लाभ ओबीसी सह कुणबी समाजाला होत असून त्याचा लाभ कुणबी समाजाने अवश्य घ्यावा व कुणबी समाजाच्या हितासाठी काम करणाऱ्या भाजपाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे मुख्य वक्ते भास्कर उरकुडे यांनी या प्रसंगी कुणबी समाजाने सज्जनशक्ती सोबत राहण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादित करीत समाजाला प्रेरक असे उद्बोधन केले. बाल वक्ता प्रसाद प्रल्हाद म्हशाखेत्री यानेही उपस्थितांना स्फूर्ती देणारे भाषण केले. सेवानिवृत्त न्यायाधीश दिलीप मस्के यांनी आपल्या समारोपीय भाषणातून समाजाला मार्गदर्शन केले.
या मेळाव्याप्रसंगी इयत्ता १०  व  १२ वी मध्ये गुणवत्ता पूर्ण उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच नव्याने रुजू झालेल्या नियुक्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन वैभव मस्के तर आभार प्रदर्शन बंडुजी झाडे यांनी मांनले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here